मुंबई :मुंबई पोलिस ठाण्यात 29 मार्च रोजी तक्रारदाराने बुलेट बाईक चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबले यांनी त्यांच्या पथकासह या प्रकरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला. आरोपींचा मागमूसही लागला नाही. आरोपींंना शोधण्यासाठी त्यांनी आसपासचे सीसीटीव्ही तपासले. तेव्हा त्यांना बुलेट बाईक चोरीला गेल्याचे दिसले. पोलिसांनी त्याचा फोटो काढून आजूबाजूच्या लोकांना दाखवला. आरोपीची ओळख गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून निष्पन्न झाली. पोलिसांनी आरोपी आपला मित्र आहे, असे सांगून त्याचा मोबाईल क्रमांक मिळविला. पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले. तेव्हा त्यांना आरोपी हे गुजरातमधील असल्याचे तपासात सिद्ध झाले.
आरोपीला बुलेटसह रंगेहात अटक : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबले यांनी एक पथक तयार केले. त्यानंतर आरोपीला बुलेटसह गुजरातच्या बहादूरगड कच्छ येथून एका रंगेहाथ अटक केली. दुसऱ्या साथीदाराला तपासात अटक करण्यात आली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली बुलेट बाईक ही सांताक्रूझ पोलिस ठाणे येथून चोरीला गेलेली होती. अटक करण्यात आलेले संजय शिवभाई कोळी आणि पुनेश वेला कोळी हे आरोपी गुजरातचे रहिवासी आहेत.