मुंबई -म्हाडाच्या आर आर बोर्डाअंतर्गत येणाऱ्या सेस इमारतींचा पुनर्विकास, संक्रमण शिबीर वाटप प्रकिया, जुन्या इमारतींची देखभाल दुरुस्तीची कामे तसेच मास्टरलिस्ट आदी कामे आता पूर्वीसारखे कागदावर न होता ऑनलाईन होणार आहेत. आर आर बोर्डाचा कारभार आता ऑनलाईन झाल्याने गैरव्यवहाराला आळा बसणार असल्याचे मानले जात आहे.
म्हाडाच्या आरआर बोर्डाचे व्यवहार होणार आता ऑनलाईन हेही वाचा - पीएमसीच्या खातेदारांना दिलासा; खात्यामधून १० हजार रुपयापर्यंत काढता येणार रक्कम
संक्रमण शिबिरातून स्वतःच्या हक्काच्या घरात जाण्यासाठी व्यवहार महत्त्वाचा ठरणार आहे. धोकादायक इमारतीतून संक्रमण शिबिरात हजारो रहिवासी वास्तव्यास आहेत. त्या सर्व रहिवाशांचे मूळ ठिकाणी पुनर्वसन करताना लालफितीच्या कारभाराची अडथळ्यांची शर्यत संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच उद्देशाने मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्ररचना मंडळाकडून लवकरच चा पर्याय आत्मसात केला जाणार आहे. त्याआधारे भविष्यात प्रत्यक्ष पुनर्वसनातील प्रक्रियेत कोणताही बाह्य हस्तक्षेप होणार नाही.
हेही वाचा - पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या; मग तिकीट वाटपाच्या चर्चा करा - भुजबळ
मुंबईतील जुन्या, धोकादायक वा दुर्घटनाग्रस्त इमारती, चाळीतील रहिवाशांना विविध संक्रमण शिबिरात पाठविण्यात येते. यातील बहुतांश इमारती दक्षिण मुंबईतील आहे. या सर्व संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे त्यांच्या मूळ भागात पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यापद्धतीने म्हाडाच्या पुनर्रचना मंडळाची योजना असली तरीही दलालांपासून अनेक स्तरावरील हस्तक्षेपामुळे पुनर्वसन हा वादाचा मुद्दा ठरला आहे. या रहिवाशांच्या मास्टर लिस्टनुसार संबंधित रहिवाशांना घरे मिळावीत असा नियम आहे.
हेही वाचा - ‘लंबी रेस का घोडा’... मिस्टर क्लिन मुख्यमंत्र्यांची राजकीय घोडदौड जोरात
त्यामुळे परस्पर घरे ताब्यात घेण्यासह मूळ रहिवाशांना योजनेपासून दूर रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा प्रमुख आक्षेप आहे. त्यासाठी मूळ रहिवाशांकडूनही विरोधाची भूमिका घेतली जाते. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने ऑनलाइनच्या सहाय्याने त्यात पारदर्शकवर भर दिला आहे.