मुंबई - म्हाडाच्या कोकण मंडळाने सामाजिक गृहनिर्माण घटकांसाठी एकात्मिक/विशेष नगर वसाहत प्रकल्पाअंतर्गत १९ ऑगस्ट २०१८ मध्ये ९ हजार १८ घरांच्या लॉटरी काढली होती. या घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया अजून सुरु असून काही विजेते त्या घरात राहायला गेले आहेत. मात्र एकात्मिक/विशेष नगर वसाहत प्रकल्पाअंतर्गत २० टक्क्यातील ६ हजार ५०० घरे म्हाडाकडे आली असून, डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही लॉटरी काढण्यात येणार अशी माहिती म्हाडाच्या कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील यांनी दिली.
म्हाडाच्या कोकण मंडळाने कोकणातील विविध तालुक्यात लक्ष केंद्रीत केले आहे. नागरिकांना विविध योजनांच्या माध्यामातून घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. म्हाडाकडे पुन्हा एकदा एकात्मिक/विशेष नगर वसाहत प्रकल्पातील २० टक्के योजनेतील ६ हजार ५०० घरे म्हाडाच्या हाती आली आहेत. महाराष्ट्रात राष्टपती राजवट असली तरी म्हाडाला लॉटरी काढण्यात कोणत्याही प्रकारची अडचण नाही. त्यामुळे मुंबईसह कोकणातील नागरिकांना म्हाडाने ६ हजार ५०० घरांचा नजराणा आणला आहे.
हेही वाचा -मुलुंडमध्ये रेशन दुकानात निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वाटप