मुंबई -सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्यासाठी म्हाडाची ओळख आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील म्हाडाच्या घरांची एक देखील लॉटरी निघाली नाही. तर आता ज्यांना स्वतःचे घर घ्यायचा आहे त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. मुंबईजवळ परवडणाऱ्या किमतीत हक्काचे घर घेण्याची संधी मुंबई-ठाणेकरांना मिळणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे नऊ हजार घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. 300 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा समावेश असेल. या घरांच्या किमती 12 ते 56 लाख रुपयांच्या दरम्यान असतील, असेही सांगण्यात आले आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाचे प्रमाणे कोकण मंडळाची सोडत ही रखडली होती. कोरोनाचा प्रभाव पडला होता गेली दोन वर्षे लॉटरी येईल, अशी आशा नागरिकांना होती. कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. 2018 मध्ये 9018 घरांसाठी सोडत निघाली होती. आता नऊ हजार घरांची लॉटरी घेऊन माळा आलेला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची प्रतिक्षा संपली आहे.
हेही वाचा -झारखंड सरकार पाडण्याचा डाव; भाजप नेत्यांच्या मागे लागणार चौकशीचा ससेमिरा?