महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत महायुतीच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत मोहिमेचा विसर - mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला युतीच्याच कार्यकर्त्यांनी हरताळ फासल्याचे चित्र दिसुन आले. गजानन किर्तीकरांचा उमेदवारी अर्ज भरतांना कार्यकर्त्यांनी खाद्यपदार्थांचे आवरण कचरापेटीत न टाकता रस्त्यावर टाकल्याने परिसर अस्वच्छ झाला होता

वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अस्वच्छता पसरवितांना युतीचे कार्यकर्ते

By

Published : Apr 9, 2019, 9:01 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारतचा नारा देत असताना शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना याचा विसर पडल्याचे चित्र वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिसून आले. युतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उन्हापासून काही वेळासाठी सुटका मिळविण्यासाठी आईस्क्रीम, पाण्याची बॉटल, खाद्यपदार्थांच्या बॉक्सचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी खाद्यपदार्थांचे आवरण कचरापेटीत न टाकता रस्त्यावर टाकल्याने परिसर अस्वच्छ झाला होता.

वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अस्वच्छता पसरवितांना युतीचे कार्यकर्ते

या प्रकरामुळे युतीच्या कार्यकर्त्यांना स्वच्छ भारत मोहिमेचा विसर पडल्याची भावना सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार गजानन कीर्तीकर यांनी शक्तिप्रदर्शन करत उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यलयात दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कीर्तीकर अर्ज भरण्यासाठी कार्यालयात गेल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांसाठी आईस्कीम, अल्पोपहार बॉक्सची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु कार्यकर्त्यानी या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर कागदी आवरणे आणि बॉक्स तिथेच टाकून दिले होते. यामुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details