मुंबई :या महिलांची नेमकी मागणी काय आहे? त्या कोणत्या कारणाने मुंबईच्या टाटा मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यात? हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही महिलांशी संवाद साधला. यावेळी ईटीव्हीशी बोलताना सरपंच रत्नमाला वैद्य म्हणाल्या की, 'ग्रामपंचायतींच्या कारभाराचा डोलारा आम्ही आता यशस्वीरीत्या आपल्या खांद्यावर घेऊ लागल्या आहोत. स्थानिक विकासकामे, गरजा व निधीचा पारदर्शी उपयोग, या सर्व कामांमध्ये एक गावचा प्रमुख म्हणून आमचं काय कर्तव्य आहे हे आम्ही शिकलोय. आणि त्यामुळेच सुशासनाद्वारे महिला आणि गावाच्या सर्वांगीण विकासावर आमचा नेहमीच भर असतो.'
विधानसभा, लोकसभेत आरक्षण हवे :पुढे बोलताना सरपंच वैद्य म्हणाल्या की, 'महाराष्ट्रात 73 व्या घटनादुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींबरोबरच महिलांना 50 टक्के आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमांचा स्वीकार करण्यात किंवा त्या आत्मसात करण्यात महिला नेहमीच तत्परता दाखवितात. त्यांना फक्त प्रोत्साहनाची गरज असते. आरक्षणामुळे आम्ही मागची काही वर्ष आमच्या गावचा डोलारा यशस्वीरित्या सांभाळतोय. मात्र, आम्हाला वाटतं फक्त ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच नाही तर आता लोकसभा आणि विधानसभेत देखील महिलांना राजकीय आरक्षण मिळायला हवे.
हेही वाचा :गावाला कोरोनापासून दूर ठेवण्यात महिला सरपंच यशस्वी राबविले विविध उपक्रम