महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

language: हिंदी वळणाचा 'ल' कुबड्या म्हणून का स्वीकारावा?, मराठीचा 'ल'वरून वादंग - language

महाराष्ट्र शासनाने भाषेच्या संदर्भात 'ल' आणि 'श' हे दोन अक्षरे कसे लिहावेत कोणत्या वळणाचे लिहावेत याबाबतचा 27 पानी शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयावर साहित्यिक, शिक्षण वर्तुळातून प्रतिक्रिया उमटली आहे. साहित्यिक क्षेत्रातून यावर जोरदार चर्चा आणि विचार मंथन सुरू झाले आहे.

मराठी भाषा
मराठी भाषा

By

Published : Nov 14, 2022, 5:32 PM IST

मुंबई - संगणक नव्हता तोपर्यंत आपल्याकडे मराठीचा 'ल' सुंदर अक्षर म्हणून गणला गेला आणि तो वापरला गेला. त्याचे कारण मराठीच्या वळणाच्या 'ल' मध्ये दोन वाट्या सारखा आकार दिसतो आणि त्याला वरती उभी रेघ यामुळे त्याची सुंदरता अधिक वाढत होती. मात्र, मुद्रण व्यवसाय मधील फाउंड्री मध्ये हिंदी वळणाचाच 'ल' आहे. म्हणून तो खपवण्यासाठी त्यावरच भर दिला गेला. त्यामुळे तो हिंदी वळणाचा 'ल' आणि 'श' प्रचलित झाला. मात्र, मराठी वळणाचा आपला सुंदर 'ल' 'श' त्याच्यामुळे मागे पडला अशी भावना मराठीच्या अभ्यासकात साहित्यिक वर्तुळात आहे.

प्रसार माध्यम आणि मराठीच्या प्राध्यापकांनी आता भूमिका घ्यावी -यासंदर्भात ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यासोबत ईटव्ही वीभारत वतीने 'ल' आणि 'श' ची भानगड काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शासनाच्या निर्णयाच्या विरुद्ध बुलंद आवाज करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणतात," कशाला पाहिजे हिंदी वळणाचा? विनाकारण कुबड्या आपण का घेतो?, मुळात फाउंड्रीमध्ये हिंदी वळणाचा होता आणि तोच विकला जावा म्हणून काही लोकांनी प्रयत्न केला. ज्या वेळेस फोटोटाइप सेटिंग नव्हते त्यावेळी हे झाले. तेव्हा लेटर प्रेससेटिंग्ज होते. फोटो टाईप सेटिंग आल्यानंतर हिंदी वळणाचा 'ल' यायला लागला. त्याचं कारण फाउंड्री वाल्यांना म्हणजे जिथे जुन्या काळात अक्षर तयार व्हायची त्या फाऊंड्रीमध्ये त्याना हिंदी वळणाचा ल विकायचा होता. तसेच संगणकाला संगणकामध्ये गुगल आलं आणि (google) इनपुटमध्ये देखील हिंदी वळणाचा 'ल' ठेवला असही ते म्हणाले आहेत.

शेंडीयुक्त श आणि पाकळीयुक्त लं आम्हाला कशाला - आपली प्रसार माध्यमे देखील जबाबदार आहेत की, त्यांनी हिंदी वळणाच्या ल बद्दल आवाज का नाही उठवला. प्रसारमाध्यमांनीच हिंदी वळणाचा ल ऐवजी मराठीतला आपला सुंदर दोन वाट्या सारखा असलेला का घेतला नाही. मी स्वतः हिंदी वळणाचा वापरत नाही. आमचा युगवाणी हा अंक हिंदी वळणाचा आम्हाला नको म्हणून आम्ही तो बऱ्याचदा उशिरा काढला आणि जोपर्यंत मराठी वळणा 'ल' टाईप करून देत नाही. तोपर्यंत आम्ही वाट पाहिली. प्रसार माध्यमांसोबत मराठीचे प्राध्यापक देखील जबाबदार आहेत. दोन लाख रुपये दर महा पगार घेणारे आमचे काही मराठी प्राध्यापक यावर बोलायला तयार नाही. यांचे पगार दरमहा 25,000 केले पाहिजे तरच ते भाषेच्या संदर्भात बोलायला लागतील अन्यथा ते तोंड उघडणार नाहीत. शेंडीयुक्त श आणि पाकळीयुक्त लं आम्हाला कशाला हवा."

आपल्या मराठीकडे स्वताचा 'लं' असताना दुसरा 'लं' का घ्यावा ?तर प्रख्यात भाषेचे अभ्यासक साहित्यिक गणेश देवी यांनी ई टीवीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मार्मिक टिप्पणी केलेली आहे ."की, 'ल' आणि 'श' हे हिंदी वळणाचे आहेत म्हणून त्याला विरोध असं नाही आहे .मात्र आपला जर 'ल'चांगला आणि नेमका असा 'ल' आणि 'श' आहे; तर आपण दुसरा का घ्यावा .आपण संगणक युगाच्या आधी ब्रिटिशांच्या काळात देखील आणि त्यानंतरही जो सुंदर 'ल' वापरत होतो. असहगी ते म्हणाले आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details