मुंबई :राज्यभरात महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांनी मोठा संप सुरू केला होता .आणि या संपाचं नेतृत्व त्यावेळेला आज सत्ताधारी असलेले गोपीचंदपडळकर सदाभाऊ खोत हे आमदार देखील करत होते. तसेच वकील गुनारत्न सदावर्ते यांनी देखील आझाद मैदानामध्ये संपकरांना आंदोलनामध्ये पाठिंबा दिला होता. आणि त्याबाबत ते स्वतः काळा कोट घालून आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलनाच्यावेळी त्यांनी घोषणा केली : या आंदोलनाच्या वेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी चितावणीखोर विधान केले आणि त्याचा परिणाम म्हणून आंदोलनावर परिणाम झाला. आणि लोक चिथावले गेले. आणि काही लोकांनी आत्महत्या देखील केल्या असा आरोप करण्यात आला होता. या आंदोलनाच्यावेळी त्यांनी घोषणा केली. त्याच्यानंतर गाणी म्हटले त्यासोबत लोकांच्या भावनांना हात घालणारी विधान केली आणि हे करत असताना त्यांनी वकिलांच्या संदर्भातला असलेला पेहराव तसाच ठेवला. आणि यामुळे बार कौन्सिलने त्यांच्याबाबत कारवाई केली होती.
वकिली पेशासाठी शोभनीय नाही : बार कौन्सिलने कारवाई करताना असा आरोप ठेवलेला आहे की, वकिलांसंदर्भातली जी आचारसंहिता आहे त्याचे जे मार्गदर्शक नियम आणि तत्व आहे त्याचे उल्लंघन गुणरत्न सदावर्ते यांनी सार्वजनिक ठिकाणी हजारो लोकांसमोर केलेले आहे. त्यामुळे हे वकिली पेशासाठी शोभनीय नाही आणि या बालकांसिलच्या कारवाईस स्थगिती मिळावी अशी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती.