महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bombay Session Court : घरातील कुत्र्यांमुळे पती-पत्नींमध्ये वाद, आर्थिक परिस्थिती नसतानाही बाळाला आईकडे सोपविण्याचा कोर्टाचा निर्णय - नवऱ्याने पत्नीला घराबाहेर काढले

नवऱ्याने आपल्या पत्नीला घराबाहेर काढले. परंतु अशा स्थितीमध्ये न्यायालयाने लहान बाळाचा विचार करता त्याचा ताबा आईकडे सोपवलेला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल देत बाळाची देखभाल संगोपनासाठी बाळाचा ताबा आईकडेच असेल, असा निर्णय दिला. तसेच पंजाब हरियाणा येथील कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने कायम ठेवला.

Bombay Sessions Court
मुंबई सत्र न्यायालय

By

Published : May 15, 2023, 10:17 AM IST

मुंबई :नवऱ्याने घरात पाच कुत्रे ठेवलेले होते. त्यामुळे पत्नीचे नवऱ्याबरोबर भांडण झाले. परंतु या कुत्र्यांमुळे लहान बाळाला त्रास होऊ शकतो, घर अस्वच्छ होते. त्यामुळे बायकोला कंटाळा आला होता. नवऱ्याने लहान बाळासह बायकोला बाहेर काढले. परिणामी ती रस्त्यावर आली. मात्र मुलाचा ताबा आपल्याकडे असावा हा नवऱ्याचा आग्रह होता. परंतु पंजाब आणि हरियाणाच्या खालच्या न्यायालयाने मुलाचा ताबा आईकडे दिला. नोकरीसाठी मुंबईला नातेवाईकांकडे आल्यामुळे सत्र न्यायालयात तिने मुलाचा ताबा मिळवण्यासाठी धाव घेतली.



नवऱ्याने पत्नीला घराबाहेर काढले :नवऱ्याने त्याची बाजू मांडली की पत्नी आर्थिक सक्षम नाही. मुलांना ती सांभाळू शकत नाही. तिच्याकडे तेवढे सांभाळण्यासाठी पुरेसे पैसेच नाही, परंतु पत्नीने सांगितले की 'बाळ आठ महिन्याचे असतानाच नवऱ्याने घरामध्ये पाच कुत्रे आणले. कुत्रे चावले तर.. त्यांची स्वच्छता राखायची की बाळाची स्वच्छता राखायची. त्यामुळे घरामध्ये अस्वच्छ वातावरण होते. परंतु यावर पतीने मलाच बाहेर काढले. मला आता बाहेर काढल्यावर मी नोकरी शोधत आहे. मी माझ्या बाळाचा सांभाळ करेल. कारण घरामध्ये देखील मला राहू दिलेले नाही.



बाळाचा ताबा आईकडे : मध्यस्थी करून यापूर्वी पती आणि पत्नीमध्ये समेट घटवण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्यावेळी देखील घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. ही बाब मांडली गेली होती. परंतु पुन्हा वाद झाल्यामुळे तिला घरातून बाहेर काढले. परिणामी बाळाला ती सांभाळू शकते बाळाचे संगोपन ती करू शकते. म्हणून बाळाचा ताबा तिच्याकडे असायला हवा, असा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने नुकताच दिला. मानवी हक्कांच्या घोषणेवर आधारित जुलै 2022 मध्ये पंजाब हरियाणाच्या खालच्या न्यायालयाने आधी बाळाचा ताबा आईकडे असावा, हा निर्णय दिला. मातेचे दूध बाळाच्या मानसिक व शारीरिक वाढीसाठी आवश्यक असते, असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने हा निर्णय घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details