मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 49 वर पोहचली आहे. म्हणून 31 मार्चपर्यंतचे पुढील 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते येथे माध्यमांशी बोलत होते.
कोरोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र, गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत. प्रत्येकाने काळजी घ्यावी, घरी सुरक्षित रहावे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. हा आजार दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच 31 तारखेपर्यंतचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे आरोग्यमंत्री म्हणाले.