महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rahul Narwekar on MLAs Disqualification : भरत गोगावलेंच्या प्रतोदपदाबाबत राहुल नार्वेकरांचा मोठा खुलासा; पुन्हा नियुक्ती.... - राहुल नार्वेकर पत्रकार परिषद

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 12 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर सगळ्यांना म्हणणे मांडण्यास संधी देऊन निर्णय घेऊ, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

Rahul Narwekar News
Rahul Narwekar News

By

Published : May 16, 2023, 2:28 PM IST

Updated : May 16, 2023, 5:57 PM IST

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सोमवारीच लंडन दौऱ्यावरून परतले आहेत. त्यापूर्वी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाची तातडीने अध्यक्षांनी घ्यावा, यासाठी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने उपाध्यक्षांना निवेदन दिले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले नार्वेकर :महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात विधानसभा अध्यक्षांचे अधिकार कायम ठेवताना, सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा असे निर्देश दिले आहेत. विधानसभेत आतापर्यंत असा फाईंड होता की पक्ष गटातील आमदार बहुमताने आपला नेता आणि प्रत्येक निवड करून विधिमंडळाला कळवत होते. त्यानुसार त्याला मंजुरी मिळत होती. परंतु न्यायालयाच्या निर्देशानुसार राजकीय पक्ष कोण हे ठरवावे लागणार आहे. शिवसेनेतील दोन गटांमुळे जुलै 2022 मध्ये राजकीय पक्ष कोणत्या गट होता, याची खात्री केल्यानंतर त्या पक्षाने नेमलेल्या प्रतोदला द्यावी लागणार आहे. त्या मान्यतेनंतर अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी पक्षादेश तपासले जातील, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकारच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी निकाल देताना विधानसभा अध्यक्षांना विशेष अधिकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. जोपर्यंत निर्णय घेण्याचा संबंध आहे, मी शक्य तितक्या लवकर हा निर्णय घेईन. कोणाच्याही दबावाखाली मी निर्णय घेणार नाही. माझ्याकडे उद्धव ठाकरे गटाकडून कोणतेही अर्ज आलेले नाहीत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. विधानभवनाबाहेर होणाऱ्या वक्तव्यांकडे मी लक्ष देत नाही - राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष

दिरंगाई नाही व गडबडही नाही :शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची निवड करताना, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी होते की नाही याची खातरजमा केली नाही. न्यायालयाने त्यामुळे तो निर्णय बाद ठरवला. परंतु गोगावले यांची निवड कायमच नियमबाह्य आहे, असे म्हटलेले नाही. उद्या राजकीय पक्ष म्हणून शिंदे नेते असतील तर त्यांना मंजुरी देऊ. उद्धव ठाकरे राजकीय पक्षाचे अध्यक्ष असतील, तर त्यांची निवड करण्यात येईल, असे नार्वेकर यांनी सांगितले. हा निर्णय घेण्यासाठी वाजवी कालावधी लागेल. तात्काळ यावर निर्णय घेता येणार नाही. मात्र हे प्रकरण निकाली काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. निर्णय घेताना कोणत्याही प्रकारची घाई गडबड केली जाणार नाही. शिवाय दिरंगाई होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

भरत गोगावलेंची पुन्हा नियुक्ती होऊ शकते. राजकीय पक्षावर आधी निर्णय घेणार आहे. त्यानंतर प्रतोद पदाच्या नियुक्तीबाबत निर्णय घेणार आहेत. माझ्याकडे पाच याचिका आल्या. त्या सर्वांवर सुनावणी घेणार आहे - राहुल नार्वेकर

भरत गोगावलेंची पुन्हा होऊ शकते नियुक्ती :2022 जुलैमध्ये कोणता राजकीय पक्ष होता, हे आधी ठरवावे लागेल. निर्णय देण्यात विनाकारण विलंब होणार नाही. जो काही निर्णय असेल तो घटनेनुसार आणि नियमानुसार असेल. ठाकरे गटाचे कोणतेही निवेदन आलेले नाही. अपात्रतेसंबंधी निर्णय घेण्याचा माझ्याकडे अधिकार आहे. कोर्टाने अध्यक्षांचे निर्णय अबाधित राखले आहेत. संजय राऊतांच्या टीकेला किंमत देत नाही. कोणत्याही दबावालाखाली येऊन काम करत नाही. निर्णय घ्यायला कोर्टाला दहा महिने लागले. तर मी दोन महिन्यात कसा निर्णय घेऊ? असा प्रश्नही राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :

  1. Minor Boy Murder In MP : अनैसर्गिक संबंधासाठी मित्राचा तीन अल्पवयीन मित्राकडून गळा आवळून खून
  2. Narayan Rane News: संजय राऊत आणि उद्धव ठाकरे नैराश्यात असल्याने बडबड करतात- नारायण राणे
  3. Amravati Crime News: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणे भोवले, भाजपच्या माजी नगरसेवकांसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Last Updated : May 16, 2023, 5:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details