मुंबई - रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवड योग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र, अनुदानित खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. ( Farmers can not afford fertilizers ) त्यामुळे या खतांच्या किमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे ( Minister Dada Bhuse ) यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविया ( Union Minister Mansukh Mandviya ) यांना पत्र लिहिले आहे.
पत्रात काय?
रब्बी हंगाम सध्या जोरात चालू आहे. अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्र राज्याचे लागवडी योग्य क्षेत्र वाढले असल्याने खताची मागणी जास्त आहे. अलीकडे अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढवल्या असल्याने एवढी महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. राज्यात अधिकाधिक अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे खतांच्या किमती पूर्ववत कराव्यात. तसेच या प्रकरणी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून खतांच्या दरांचा ताबडतोब आढावा घ्यावा आणि खतांच्या दरातील वाढ मागे घेण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करावेत, अशी मागणी मंत्री भुसे यांनी आपल्या पत्रात केली आहे.