मुंबई2024 Lok Sabha Elections: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर विराजमान करण्यासाठी भाजपाने कंबर कसलीय. महाराष्ट्रात मिशन 45 अंतर्गत भाजपा जोरात तयारीला लागलाय. अशात भाजपाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झालीय. मुंबईतून धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या नावाची चर्चाही जोरात सुरू आहे. विशेष करून दोन दिवसांपूर्वी गणपती दर्शनासाठी आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये झालेल्या चर्चेदरम्यान मुंबईतून अभिनेत्री माधुरी दीक्षित तसंच जळगावमधून प्रसिद्ध वकील उज्वल निकम, धुळ्यातून प्रतापराव दिघावकर व पुण्यामधून सुनील देवधर यांना तिकीट देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
माधुरी दीक्षित यांच्या नावावर चर्चा :दोन दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत मुंबई, पुणे, धुळे आणि जळगाव लोकसभा मतदार संघाबाबत या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. या मतदारसंघात विजयाची खात्री असलेले उमेदवार देण्याबाबत चर्चा झाली. विशेष म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना मुंबईतून कुठल्या लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं जाऊ शकतं, याबाबत चाचपणी करण्यासोबत माधुरी दीक्षित यांनाही विचारणा करण्यात येणार आहे.
चारही नावावर चर्चा :या दरम्यान झालेल्या चर्चेत भाजपाकडून मुंबईतून अभिनेत्री माधुरी दीक्षित, जळगावमधून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम, पुण्यातून सुनील देवधर आणि धुळ्यातून प्रतापराव दीघावकर यांना तिकीट देण्यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. या सर्वांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेतली जाणार आहे, तरी पक्षानं यापूर्वी सुद्धा त्यांच्या विचार केला होता, असे सांगण्यात येतंय. तसेच ते सुद्धा निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत की नाही हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. दरम्यान, या चारही नावावर झालेल्या चर्चेबाबत भाजपाकडून कुणीही बोलण्यास तयार नाहीय.
अमित शाहंसोबतची बैठक गुलदस्त्यात :अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेत भाजपकडून मुंबईतून माधुरी दीक्षित, जळगावमधून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम, पुण्यातून सुनील देवधर आणि धुळ्यातून प्रतापराव दीघावकर यांना तिकीट देण्यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. तसेच या सर्वांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. ते निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत की नाही, हे पाहिलं जाणार आहे, असं सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान, या चारही नावावर झालेल्या चर्चेबाबत भाजपाकडून कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही, तरी शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नक्की काय घडलं हे सुद्धा गुलदस्त्यातच आहे.