मुंबई - किमान महिनाभर मुंबई आणि एमएमआरमधील मेट्रो प्रकल्पाचे काम बंद होते. पण 20 एप्रिलला राज्य सरकारच्या परवानगीनुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कडून सुरुवात झाली आहे. त्यानुसार आता मेट्रो 2 ब आणि मेट्रो 4च्या कामाने गती घेतल्याची माहिती आज एमएमआरडीएने दिली आहे. आता या दोन्ही मार्गातील महत्त्वाच्या अशा टप्प्याला अर्थात गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात केली असल्याचेही एमएमआरडीएने स्पष्ट केले.
मेट्रो-2 ब आणि मेट्रो-4 च्या कामाला वेग; गर्डर बसण्याच्या कामाला सुरुवात - MMRDA
मेट्रो 7 प्रकल्प वेगाने पुढे जात असून आता लवकरच मार्गावर सरकते जिने आणि लिफ्ट लावण्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कारण सरकते जिने आणि लिफ्ट आता हळूहळू मुंबईतील पोर्टवर आणि पुढे साईटवर दाखल होत आहेत.
लॉकडाऊनमध्ये मेट्रोच्या कामाला परवानगी मिळाल्यानंतर दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो-7, डी.एन. नगर ते मंडाले मेट्रो-2 ब आणि वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो-4 प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली. फिजिकल डिस्टन्सिंग आणि इतर नियम पाळत ही कामे करण्यात येत आहेत. मेट्रो 7 प्रकल्प वेगाने पुढे जात असून आता लवकरच मार्गावर सरकते जिने आणि लिफ्ट लावण्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कारण सरकते जिने आणि लिफ्ट आता हळूहळू मुंबईतील पोर्टवर आणि पुढे साईटवर दाखल होत आहेत.
दरम्यान, दुसरीकडे मेट्रो 2 ब आणि मेट्रो 4 च्या कामालाही गती देण्यात आली आहे. हे काम पुढे पूढ जात असून ते आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचले आहे. ते म्हणजे आता या मार्गावर गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हा वेग पाहता हे सर्व प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करत ते मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.