महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Metro : मेट्रो वुमन अश्विनी भिडेंचा पुढाकार, मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबर 23 मधे सुरु होणार

मुंबई मेट्रो (Mumbai Metro) लाईन तीन कुलाबा ते सिपझ या प्रकल्पाचे काम मेट्रो वुमन (Metro Women) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो प्रकल्प व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांच्या मार्गदर्शनाखाली (Metro Women Ashwini Bhides initiative) वेगात सुरू आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा ( The first phase of the metro ) डिसेंबर 2023 मध्ये सुरू (will start on December 23) होईल, असा दावा सरकारने (Claim of Govt) केला आहे.

Ashwini Bhide
अश्विनी भिडे

By

Published : Oct 26, 2022, 4:07 PM IST

मुंबई:मेट्रो प्रकल्पांची जबाबदारी पुन्हा एकदा मेट्रो वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी भिडे यांच्या खांद्यावर सरकारने दिली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून भिडे यांनी आपल्या कामाचा वेग वाढवला आहे. मुंबईतील सर्वच मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यातील महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो ३ लाईनवर सध्या वेगाने काम करून घेण्यासाठी भिडे सरसावल्या आहेत.



पर्यावरणाचा समतोल :राज्य शासन सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या कामांना प्राधान्य देत आहे. मेट्रो ३ च्या पूर्णत्वानंतर सुमारे १७ लाख प्रवासी प्रवास करू शकणार असून यामुळे रस्त्यावरील सुमारे सात लाख खासगी वाहनांची वर्दळ कमी होईल. याप्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच वायू आणि ध्वनी प्रदूषण देखील कमी होईल. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होईल. अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाविषयी स्पष्ट केले होते.



रस्त्यावरील वाहतूकीचा ताण वाचणार :या मेट्रोमुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होणार असल्याने सुमारे 2.30 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. जी झाडे तोडावी लागली त्यांनी जितके कार्बन शोषून घेतले असते, मेट्रोमुळे केवळ 80 दिवसात तेवढे कमी उत्सर्जन होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. हरित लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयाने सर्व घटकांचा विचार करुन या प्रकल्पाला परवानगी दिल्याने मुंबईच्या हितासाठी आवश्यक निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करताना भिडे यांच्या देखरेखी खाली हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, असेही म्हटले होते.



डिसेंबर 2023 मध्ये पहिला टप्पा : या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी अश्विनी भिडे यांनी आपल्या टीमला सूचना दिल्या असून कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर 2023 मध्ये प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांबद्दल भिडे त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानुसाक मुंबई मेट्रो मार्ग 3 च्या रेल्वे गाड्या 8 डब्यांच्या असतील. 75 टक्के मोटरायझेशन मुळे गाड्यांच्या धावण्याची कार्यक्षमता उत्तम राहील. रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे 30 टक्के विद्युत उर्जेची बचत होईल आणि चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज कमी होईल.




एका गाडीत सुमारे 2400 प्रवासी : एका गाडीतून सुमारे 2400 प्रवासी प्रवास करू शकतील. 85 किमी प्रतितास अशा प्रत्यक्षातील वेगामुळे प्रवाशांचा एकूण प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होईल.
स्टेनलेस स्टीलच्या वापरामुळे मेट्रोचे डबे किमान 35 वर्षे टिकू शकतील. ट्रेनसाठी चालक विरहित प्रणाली स्वीकारली असून अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) सिग्नल व्यवस्थेमुळे 120 सेकंदची फ्रिक्वेन्सी ठेवणे शक्य होणार आहे.



डब्याच्या प्रत्येक बाजूला चार दरवाजे: प्रवाशांच्या सुलभतेसाठी डब्याच्या प्रत्येक बाजूला चार दरवाजे असतील. स्वयंचलित प्रकाश नियंत्रण वैशिष्ट्यासह अद्ययावत वीज प्रणाली ऊर्जेचा वापर कमी करण्यास मदत करेल. ट्रेनच्या छतावर स्थित ‘व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी (VVVF)’ प्रणालीद्वारे वातानुकूलन यंत्रणेचे नियंत्रण केल्याने 4 ते 5 टक्के ऊर्जा बचत होईल. डब्यांमध्ये वातानुकूलन यंत्रणेअंतर्गत कार्बन डायऑक्साइड आणि आर्द्रतेसाठी स्वयंचलित नियंत्रण प्रणाली असल्याने सर्व हवामान परिस्तिथीमध्ये प्रवाशांना उत्तम आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल.


सेवा चाचण्यांचे नियोजन : रोलिंग स्टॉक आणि ट्रॅक या दोन्हीच्या डिझाइनची योग्यता सिद्ध करून आवश्यकतेप्रमाणे पुढील नवीन तांत्रिक सुधारणा अंमलात आणता याव्यात म्हणून ‘मुंबई मेट्रो मार्ग-3‘ या संपूर्ण भूमिगत मर्गिकेवर नुकतीच ट्रेन चाचणी करण्यात आली. सेवा चाचण्यांचे नियोजन मार्ग 3 साठी डेपो सुविधेसोबत आवश्यक संख्येने गाड्यांचे संच उपलब्ध झाल्यानंतर केले जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details