मुंबई- सायन पनवेल महामार्गावरील चेंबूर परिसरातील डायमंड उद्यानाजवळ मुंबई मेट्रो-२ (बी) चे काम सुरू होते. या दरम्यान एका पिलरचे काम सुरू असताना लोखंडी सांगाडा खाली कोसळला. दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली.
चेंबूरमध्ये मेट्रो पिलरचा लोखंडी सांगाडा कोसळला; जीवितहानी टळली - सायन पनवेल महामार्ग
पिलरचे काम सुरू असताना लोखंडी सांगाडा खाली कोसळला. दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
![चेंबूरमध्ये मेट्रो पिलरचा लोखंडी सांगाडा कोसळला; जीवितहानी टळली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3941844-thumbnail-3x2-oi.jpg)
हाच तो मेट्रोचा पडलेला भाग
चेंबूर मध्ये मेट्रो पिलरचा लोखंडी सांगाडा कोसळला; जीवितहानी टळली
या घटनेवेळी रस्त्यारून बरीच वाहने जात होती. पिलरचा सांगाडा जास्त हालत होता आणि अचानक तो एकीकडे झुकला. त्यावेळी स्थानिकांनी आरडाओरडा केली आणि वाहन थांबवली. सुदैवाने या सांगाड्याखाली कामगार आले नाहीत. त्यामुळे मोठा अपघात टळला.