मुंबई - मेट्रो कारशेड समितीकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात कारशेड दुसऱ्या ठिकाणी हलवणे व्यवहार्य नसल्याचे नमूद केले आहे. यावर पर्यावरणप्रेमी व वनशक्ती संस्थेचे संस्थापक डी. स्टॅलिन यांनी प्रतिक्रिया देताना, अहवाल सरकारवर बंधनकारक नाही, सरकार आपला निर्णय घेऊ शकते. या अहवालावर तज्ञांना घेऊन अहवाल बरोबर आहे की, नाही याचा पुर्नविचार सरकारने करावा, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.
मुळात आरे कारशेडसाठी नेमण्यात आलेली समिती चुकीची असल्याचे स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. या समितीत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनाच घेऊन समिती स्थापन केली आहे, हे चुकीची असल्याचे डी. स्टॅलिन यांनी म्हटले. याउलट सरकारने या प्रकरणी स्वतंत्र तज्ञ घेऊन कारवाई करणे आवश्यक होते.