महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mephedrone worth over Rs 4 crore : दया नायक पुन्हा अ‌ॅक्शन मोडमध्ये... चार कोटींच्या एमडीसह दोघांना केली अटक - दया नायक चार कोटी एमडी जप्त

Mephedrone worth over Rs 4 crore मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष 9 ने 4 कोटींच्या एमडीसह दोन आरोपींना अटक केलीय. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केलीय. अर्शद अहमद शेख आणि इम्रान नूर मोहम्मद मेमन अशी दोन अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आज पहाटे चार साडेचारच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आल्याची माहिती कक्षा नऊचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी दिली आहे.

Mephedrone worth over Rs 4 crore
Mephedrone worth over Rs 4 crore

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 9:52 PM IST

मुंबईMephedrone worth over Rs 4 crore: अंधेरी पश्चिम येथील डी एन नगर भागात कोणीतरी ड्रग्ज विकणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा कक्ष 9 ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अर्शद अहमद शेख आणि इम्रान नूर मोहम्मद मेमन या दोन आरोपींना 2 किलो 33 ग्रॅम एमडीसह अटक केली. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत 4 कोटी 6 लाख 60 हजार रुपये असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मुंबई पोलीसांची विशेष मोहिम-बकरी विकणारा अर्शद अहमद मोबीन शेख (वय 26) हा आरोपी वसई येथे राहत असून हा मुख्य आरोपी आहे. त्याचप्रमाणे दुसरा आरोपी इम्रानोर मोहम्मद मेमन (वय 26 ) हा आरोपी देखील वसई येथे राहणारा असून या दोघांवर आज पहाटे चार वाजून 40 मिनिटांनी कारवाई करण्यात आली आहे. अंमली पदार्थाच्या वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याकरिता मुंबई पोलीसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत कक्षा नऊ मुंबईत मागील काही दिवसांपासून अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करणाऱ्या गुन्हेगारांच्या मागावर होते.

चार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त- डी. एम. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन संशयित मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाचा मोठा साठा घेवून येणार आहेत, अशी माहिती कक्ष ९ चे प्रभारी पोलीस निरिक्षक दया नायक यांना प्राप्त झाली. या माहितीची प्रत्यक्ष खातरजमा केल्यानंतर कक्ष ९ च्या पथकाने महानगरपालिका उर्दु स्कुल येथे सापळा रचून २ आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडती चार कोटी रुपयांचे अमली पदार्थ मिळून आले. या दोन्ही आरोपींना विरोधात डी एन नगर पोलीस ठाण्यात कलम ८ (सी), २२ (सी), २९ एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त (प-१) अमोघ गावकर, सहायक पोलिस आयुक्त महेश देसाई यांच्या सूचनेनुसार कारवाई गुन्हे शाखा ९ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने केली आहे

आरोपीचा शोध सुरू-याप्रकरणी डी एन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी दिशान खान उर्फ ​​दिशान बटाटा याचा शोध सुरू आहे. ही कारवाई अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट रोडवर असलेल्या मुन्सिपल उर्दू शाळा क्रमांक दोन समोर झाली आहे. दोन्ही आरोपींकडून 2033 ग्राम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. त्याचे अंदाजे किंमत चार कोटी सहा लाख 60 हजार रुपये इतके आहे.

हेही वाचा-

  1. Drug Trafficking : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 75 परदेशी नागरिकांच्या मुसक्या आवळल्या, साडेचार कोटींचे ड्रग जप्त
  2. Financial Fraud With Drug Seller: शेअर बाजारातून दामदुप्पटचे आमिष दाखवून औषध विक्रेत्याला घातला ५० लाखांचा गंडा

ABOUT THE AUTHOR

...view details