मुंबई- रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या शुक्रवारपासून पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गाला जोडणारी दिवा-वसई रोड, पनवेल-दिवा-वसई रोड मेमू गाडी सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासात जाणारा अतिरिक्त वेळ आणि जादा पैसा वाचणार आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार उपनगरीय लोकल प्रमाणे या मेमूला कोरोना नियम लागू आहेत. त्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दैनंदिन तिकीट मिळेल. तर, कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या लसवंतांना मासिक पास मिळेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी : वसई ते पनवेल मेमू सेवा शुक्रवारपासून होणार सुरु - Memu Service Vasai - Panvel
रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या शुक्रवारपासून पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गाला जोडणारी दिवा-वसई रोड, पनवेल-दिवा-वसई रोड मेमू गाडी सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासात जाणारा अतिरिक्त वेळ आणि जादा पैसा वाचणार आहे.
दिवा-वसई रोड विभाग-
61002 दिवा येथून ०५.४९ वा. प्रस्थान, वसई रोड येथे ०६.४५ वा. आगमन.
61003 वसई रोड येथून ०९.५० वा. प्रस्थान, दिवा येथे १०.५० वा. आगमन.
61004 दिवा येथून ११.३० वा. प्रस्थान, वसई रोड येथे १२.३० वा. आगमन.
61005 वसई रोड येथून १२.५५ वा. प्रस्थान, दिवा येथे १३.५५ वा. आगमन.
61006 दिवा येथून १४.३३ वा. प्रस्थान, वसई रोड येथे १५.२५ वा. आगमन.
61007 वसई रोड येथून १५.५५ वा. प्रस्थान, दिवा येथे १६.५५ वा. आगमन.
61008 दिवा येथून १७.५५ वा. प्रस्थान, वसई रोड येथे १८.५५ वा. आगमन.
61009 वसई रोड येथून १९.१५ वा. प्रस्थान, दिवा येथे २०.०७ वा. आगमन.
पनवेल - दिवा - वसई रोड विभाग (शनिवार आणि रविवार वगळता):
61016 पनवेल येथून ०८.२५ वा. प्रस्थान दिवा येथे ०९.१० वा. आगमन.
61017 दिवा येथून ०९.२५ वा. प्रस्थान, पनवेल येथे १०.०५ वा. आगमन.
61018 पनवेल येथून १०.३० वा. प्रस्थान दिवा येथे ११.१० वा. आगमन.
61019 दिवा येथून ११.२० वा. प्रस्थान, पनवेल येथे १२.०१ वा. आगमन.
61020 पनवेल येथून १२.१० वा. प्रस्थान दिवा येथे १२.५० वा. आगमन.
61022 दिवा येथून १६.२५ वा. प्रस्थान, वसई रोड येथे १७.२५ वा. आगमन.
61021 वसई रोड येथून १७.३५ वा. प्रस्थान, दिवा येथे १८.३५ वा. आगमन.
61015 दिवा येथून १८.४५ वा. प्रस्थान, पनवेल येथे १९.२५ वा. आगमन.