महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

.... मागतो मी माफी, केल्या न केल्या त्या सर्व गुन्ह्यांची ! - memorial day of namdeo dhasal

अन्याविरोधात भमिका घेत पोटतिडकीने नामदेव ढसाळांनी सामाजितक समतेचा, समानतेचा प्रश्न चव्हाट्यावर आणला. महिलांच्या हक्कांसाठी काम केलेला नामदेव ढसाळ हा महान नेता होता, अशी भावना अविनाश महातेकर यांनी व्यक्त केली.

Namdeo Dhasal
नामदेव ढसाळ

By

Published : Jan 16, 2020, 10:21 AM IST

मुंबई -दलित पँथरचे संस्थापक सदस्य आणि थोर दलित कवी नामदेव ढसाळ यांचा 15 जानेवारीला सहावा स्मृतीदिन होता. याच पार्श्वभूमीवर ढसाळ यांचे मित्र आणि दलित चळवळीतील त्यांचे सहकारी अविनाश महातेकर यांनी त्यांच्या सोबतच्या आठवणी जागवल्या आहेत.

अविनाश महातेकर यांनी जागवल्या नामदेव ढसाळ यांच्या सोबतच्या आठवणी...

हेही वाचा... 'होय! मी सावरकर भक्त आहे'

कवितांच्या माध्यमातून शोषितांचा आवाज जगभर पोहोचविणारे महान कवी आणि दलित पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांचा बुधवारी सहावा स्मृतीदिन होता. 15 जानेवारी 2014 ला ढसाळ यांचे निधन झाले. मात्र, आजही ढसाळ आपल्या कवितांतून जिवंत आहेत. ढसाळांनी दलित पँथरच्या माध्यमातून दलितांची राज्यव्यापी संघटना उभारून अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम केले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना ज्येष्ठ आरपीआय नेते अविनाश महातेकर यांनी उजाळा दिला.

हेही वाचा... 'संजय राऊतांच्या विधानाने सर्वांची मान खाली गेली, या माणसाच्या बुद्धीला काय झाले?'

नामदेव ढसाळ खूप मोठे कवी होते. शोषितांचे जगणे, दुःख आदी गोष्टी त्यांनी समाजासमोर मांडले. आजारी असताना ढसाळ आपल्याला भेटले होते. तेव्हा त्यांनी एक कविता वाचण्यासाठी दिली होती. 'चैत्यासमोर नतमस्तक होऊन मागतो मी माफी, केल्या न केल्या त्या गुन्ह्याची' अशा त्या कवितेच्या ओळी होत्या. आपण जेव्हा ती कविता पुन्हा वाचली, तेव्हा असे वाटले होते की ढसाळ यांनाच कदाचित त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली आहे, असे महातेकर यांनी सांगितले.

नामदेव ढसाळ आणि अविनाश महातेकर

हेही वाचा.... शिवाजी महाराजांची उपाधी 'छत्रपती' हीच होती, 'जाणता राजा' नव्हे - शरद पवार

नामदेव ढसाळ हे दलित पँथरच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. एवढेच नव्हे तर पँथरचे जे आकर्षण निर्माण झाले ते नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांच्या नावामुळे झाले. यात ढसाळ यांचे योगदान मोठे होते. मराठी साहित्याच्या बंद दारावर धडक मारण्याचे काम कोणी केले असेल तर ते ढसाळ यांनी केले असल्याचे महातेकर यांनी म्हटले.

हेही वाचा... 'उदयनराजेंच्या विरोधात विधान केल्यास ठोकून काढू'- मराठा क्रांती मोर्चा

मराठी साहित्याच्या विशिष्ट चौकटीतून बाहेर पडण्याचे काम ढसाळ यांनी केले. हे धाडस त्यांनी आंबेडकरी प्रेरणेतून केले. कविता ही त्यांची वेदना होती. चळवळीत ते कितीही व्यस्त असले, तरी कवितेची संगत मात्र कधीही त्यांनी सोडली नाही. फक्त मराठी भाषेत नाही तर जागतिक स्तरावर त्यांच्या कवितेची तुलना होऊ शकते, असेही महातेकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details