महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा ते माटूंग  रेल्वे स्थानाकादरम्यान अप-डाऊन जलद  मार्गावर आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक आहे.

Mumbai railway megablocks news
आज मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

By

Published : May 23, 2021, 7:09 PM IST

मुंबई -उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा ते माटूंग रेल्वे स्थानाकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोड रेल्वे स्थानकादरम्यान रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक -

मध्य रेल्वेच्या भायखळा ते माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. याब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा भायखळा ते माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. या लोकल सेवा भायखळा ते माटुंगा दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. अप मार्गावरील लोकल भायखळानंतर, तर डाऊन मार्गावरील लोकल माटुंगानंतर जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे.

हार्बल रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक -

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे, सीएसएमटी-वडाळा ते पनवेल-बेलापूर-वाशी, सीएसएमटी ते वांद्रे-गोरेगाव अप-डाऊन मार्गावरील
सकाळी 9.53 वाजता ते सायंकाळी 4.58 वाजेपर्यत मेगाब्लॉक आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- चुनाभट्टी-वांद्रे अप-डाऊन मार्गावरील लोकल ब्लॉग दरम्यान रद्द करण्यात येतील. सीएसएमटी-वडाळा ते पनवेल-बेलापूर-वाशी, सीएसएमटी ते वांद्रे-गोरेगाव अप-डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येतील. या ब्लॉगदरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पनवेल ते कुर्ला आणि कुर्ला ते सीएसएमटीसाठी विशेष लोकल गाड्या कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वरून चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक-

पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवारी भाईंदर ते वसई रोड रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्री रविवारी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये अप आणि डाऊन मार्गावरील धिम्या मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येतील.

हेही वाचा - ऑक्सिजन वापराबद्दल आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्वे; रुग्णालयांनी दुर्लक्ष केल्यास होणार कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details