मुंबई : गोरेगाव दरम्यान डाऊन फास्ट लाईनवर BY91019 चर्चगेटवरून 23.27, BY91023 चर्चगेट 23.38, NSP91027 चर्चगेट वरून 23.46, BO91031 चर्चगेट 23.52, VR 91033 चर्चगेट 23.58, BY91037 चर्चगेट 00.09, BVI91041 चर्चगेट 00.16, VR91043 चर्चगेटहून 00.20, BY91045 चर्चगेटहून 00.28, BO91049 चर्चगेट 00.38, BY91051 चर्चगेट 00.43, VR 91053 चर्चगेट 00.50, BO91055 चर्चगेट 01.00, BO 90001 वांद्रे येथून 04.05 या लोकल चालवल्या जातील आणि विलेपार्ले येथे दुहेरी थांब्याचा लाभ घेतील आणि प्लॅटफॉर्मच्या अभावी राम मंदिर येथे थांबणार नाहीत.
जलद मार्गावर चालणार :VR91016 विरार 23.40 Hrs आणि BY91035 अंधेरी 00.46 वाजता गोरेगाव - अंधेरी दरम्यान दोन्ही दिशांना जलद मार्गावर चालवले जाईल आणि UP आणि DOWN दिशेने राम मंदिर येथे थांबणार नाही. VR92005 अंधेरी 04.40 वाजता ब्लॉक हटवल्यानंतर जलद मार्गावर चालवले जाईल. अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान या ट्रेन थांबणार नाहीत.
एक्स्प्रेस दुसऱ्या ट्रॅकवरून धावणार :ट्रेन क्रमांक 22923 वांद्रे टर्मिनस - जामनगर हमसफर एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 22965 वांद्रे टर्मिनस - भगत की कोठी एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 19003 वांद्रे टर्मिनस - भुसावळ खान्देश एक्सप्रेस या गाड्या सांताक्रूझ ते बोरिवली 5 व्या मार्गावर चालवल्या जातील आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 6 ऐवजी बोरिवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर चालवल्या जातील. जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकादरम्यान प्रवाशांना विरुद्ध दिशेने प्रवास करण्याची परवानगी आहे.
पूल पाडकामासाठी एवढी मोठी तयारी :मुंबई मध्य रेल्वेच्या मार्गावरील 20 नोव्हेंबर, 2022 रोजी तब्बल 27 तासांच्या जम्बो ब्लॉकला सुरुवात झाली होती. कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉकमुळे लोकलसह एक्स्प्रेस ट्रेनवर देखील परिणाम झाल्याचे नोंदविण्यात आले होते. यामुळे प्रवाशांना त्रासही सहन करावा लागत होता. मेगाब्लॉकमुळे अनेक लोकल गाड्या, एक्स्प्रेस गा्डया रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यास सुरुवात झाली होती.
हेही वाचा :BMC Election : मुंबई महापालिकेत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी भाजपची रणनीती