मुंबई- आज पडलेल्या मुसळधार पावसात मध्य रेल्वे काही काळ ठप्प झाली होती. सायंकाळी उशिराने वाहतूक सुरू झाली. त्यामुळे रविवारी मध्य रेल्वे मार्गावर घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
रविवारी मध्य रेल्वेचा 'मेगाब्लॉक' रद्द - THANE
मुसळधार पावसात मध्य रेल्वे काही काळ ठप्प झाली होती. सायंकाळी उशिराने वाहतूक सुरू झाली. त्यामुळे रविवारी मध्य रेल्वे मार्गावर घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
कल्याण ठाणे अप जलद मार्गावर रविवार सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी / बांद्रा अप आणि डाउन मार्गावर रविवारी सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ ते गोरेगाव या स्थानकादरम्यान जम्बोब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत दोन्ही दिशेकडील धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला आहे. ब्लॉकदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येईल. विलेपार्ले स्थानकावर फलाट क्रमांक 5/6 ची लांबी कमी असल्याने येथे लोकलला डबल थांबा दिला जाईल. राम मंदिर स्थानकावर फलाट नसल्याने या स्थानकावर ब्लॉक दरम्यान एकही लोकल थांबणार नाही.