मुंबई- देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात अधिक लोकांची कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना विरोधात लढण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आयआयटी माजी विद्यार्थी परिषदेने गुरुवारी एक महत्त्वाची घोषणा केली. मुंबईत दरमहा 1 कोटी लोकांची चाचणी क्षमता असलेली मेगालॅब सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोबतच यासाठी लवकरच जागतिक स्पर्धेद्वारे भागीदारांची निवड करणे सुरू करणार असल्याचेही परिषदेने म्हटले आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच शहरात पहिली 'कोविड टेस्ट बस' सुरू केल्यानंतर मेगापोलिसमधील दोन सुपर कॉम्प्यूटर क्लस्टरवर चाचण्याही सुरू झाल्या आहेत, असेही परिषदेने म्हटले आहे.