महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत रविवारी मध्य, हार्बर रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक - मध्य मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉग दरम्यान सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहे. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल मशिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी करीरोड आणि विद्याविहार या स्थानकावर थांबणार नाही त्यानंतर नियोजित मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. मात्र, ब्लॉक काळात सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी करीरोड आणि विद्याविहार या रेल्वे स्थानकावर लोकल थांबणार नाही.

megablock
मेगाब्लॉक

By

Published : Apr 23, 2021, 7:22 PM IST

मुंबई- उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी 25 एप्रिल 2021 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी मेगा ब्लॉक असणार आहे. तर हार्बर मार्गवरील कुर्ला ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.

सीएसएमटी ते विद्याविहार मेगाब्लॉक-

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉग दरम्यान सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहे. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल मशिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी करीरोड आणि विद्याविहार या स्थानकावर थांबणार नाही त्यानंतर नियोजित मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. मात्र, ब्लॉक काळात सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी करीरोड आणि विद्याविहार या रेल्वे स्थानकावर लोकल थांबणार नाही.

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक-

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी 11.10 वाजता ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.39 दरम्यान वाशी, पनवेल, बेलापूर करिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सकाळी10.21 ते सायंकाळी 3.41 वाजेपर्यंत सीएसएमटी करीता सुटणारी सेवा रद्द राहतील. तर या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कुर्ला दरम्यान तसेच पनवेल आणि वाशीदरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details