महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शनिवारी पश्चिम रेल्वे मार्गावर तर आज मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक - central railway

शनिवारी रात्री मेगाबॉल्क घेण्यात आल्यामुळे आज (रविवारी) सकाळी पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना बॉल्कच्या त्रासाला सामोर जावे लागणार नाही. तर आज (रविवारी) मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान आमि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान मेगाबॉल्क घेण्यात येणार आहे.

मेगाब्लॉक

By

Published : May 19, 2019, 2:22 AM IST

Updated : May 19, 2019, 2:47 AM IST

मुंबई- शनिवारी रात्री बोरिवली ते भाईंदर दरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली. रेल्वेच्या विविध कामांसाठी हा बॉल्क घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. रात्री मेगाबॉल्क घेण्यात आल्यामुळे रविवारी सकाळी पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना बॉल्कच्या त्रासाला सामोर जावे लागणार नाही. तर आज (रविवारी) मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान आमि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान मेगाबॉल्क घेण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे टर्मिनस या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.10 वेळेत मेगाबॉल्क घेण्यात येणार आहे. परिणामी वडाळा स्थानक ते वाशी, बेलापूर, पनवेल आणि वांद्रे, गोरेगाव दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पनवेल कुर्ला मार्गावर लोकच्या विशेष फेऱ्या चालण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते भाईंदर स्थानकादरम्यान दोन्ही जलद मार्गावर शनिवारी रात्री 11.30 ते आज (रविवारी) पहाटे 4.30 दरम्यान मेगाबॉल्क घेण्यात येणार आहे. परिणामी जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असल्यामुळे काही लोकलच्या फेऱ्या विलंबाने धावण्याची शक्यता आहे. परंतू या मार्गावर रात्री बॉल्क घेण्यात आल्यामुळे प्रवाशांना दिवसा कोणत्याही बॉल्कचा सामना करावा लागणार नाही.

मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटूंगा अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.15 दरम्यान मेगाबॉल्क घेण्यात येणार आहे. परिणामी बॉल्क काळात लोकलच्या फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर आज (रविवारी) सकाळी 10.25 पासून मुंबईत येणाऱ्या अथावा मुंबईवरून सुटणाऱ्या मेल-एसप्रेस धीम्या मार्गावरुन धावतील. परिणामी लोकल 20 ते 25 मिनिटे उशिरा धावण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी- दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंत धावणार आहे. दिवा स्थानकापासून रत्नागिरीसाठी गाडी सोडण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दुपारी 3.40 वाजता दादर स्थानकापासून विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत.

Last Updated : May 19, 2019, 2:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details