महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देखभालीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेचा आज मेगा ब्लॉक

मध्य पश्चिम आणि हरबर रेल्वे मार्ग तिन्ही रेल्वे मार्गांचा मेगाब्लॉक थोड्यावेळापासूनच सुरू झालेला आहे आणि हा सायंकाळी चार वाजेपर्यंत असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित स्थानकांवर वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पुढे जलद असलेल्या गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

center railways megabook
मध्य रेल्वेचा आज मेगा ब्लॉक

By

Published : Jan 15, 2023, 12:03 PM IST

मुंबई :ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन वेळापत्रकानुसार त्यांच्या संबंधित स्थानकांवर थांबवल्या जातील. पुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (नेरुळ/बेलापूर-खारकोपर लाईन वगळून)

पनवेल/बेलापूर येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/गोरेगावकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणेकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


नेहमीपेक्षा कमी संख्येने ट्रेन धावणारब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ - खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. मेगा ब्लॉक असल्यामुळे आणि तसेच टाटा मॅरेथॉन ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्यामुळे सकाळपासूनच अनेक ठिकाणी गर्दी जाणवत होती. त्यामुळे यासाठी अधिकच्या बेस्ट बसदेखील आज मुंबईच्या विविध मार्गावर धावत आहे. तसेच विशेष टाटा मॅरेथॉन साठी रेल्वेची सोयदेखील आहे. त्यामुळे जनतेने त्या विशेष ट्रेनचा देखील उपयोग करावा असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. मात्र नेहमीपेक्षा कमी संख्येने ट्रेन धावणार आहेत. अनेक ट्रेन रद्द झालेल्या आहेत. त्यामुळे जनतेने याबाबत नियोजन करून प्रवासाला निघावे. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे


वसई रोड आणि विरार स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक -ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणे देखभालीचे काम करण्यासाठी वसई रोड आणि विरार स्थानकांदरम्यान मंगळवार, 17 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 00.30 ते 04.30 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर चार तासांचा जंबो ब्लॉक पाळण्यात येईल. ब्लॉक कालावधीत वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावरून काही डाऊन स्लो मार्गावरील गाड्या वळवण्यात येतील. त्यानुसार, रविवार, 15 जानेवारी 2023 रोजी पश्चिम रेल्वे उपनगरीय विभागात कोणताही दिवसाचा ब्लॉक असणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details