मुंबई :मुंबईत आजतिन रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक आहे.मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गात मध्य रेल्वेच्या संदर्भात माटुंगा ते मुलुंड या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान कल्याणकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11 वाजून पाच मिनिटे ते दुपारी सुमारे चार वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये प्रवाशांनी आपल्या प्रवासाच्या वेळेचे नियोजन करावे. यामुळे माटुंगापासून मुलुंड रेल्वे स्थानकापर्यंत कल्याणकडे जाणाऱ्या आणि कल्याण मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गाच्या सर्व ट्रेन या धीम्या रेल्वे मार्गावरून चालवण्यात येतील. त्यामुळे या लोकल वीस मिनिटे उशिराने धावणार आहेत.
लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार :हार्बर रेल्वे मार्ग हार्बर रेल्वे मार्ग हा नेरूळ पनवेल ते छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत आहे. या मार्गावर मानखुर्द रेल्वे स्थानक ते नेरूळ रेल्वे स्थानक अप आणि डाऊन मार्गावर सकाळी सव्वा अकरा ते दुपारी सव्वा चारपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे मानखुर्द रेल्वे स्थानक ते नेरूळ रेल्वे स्थानकादरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून ते मानखुरपर्यंत रेल्वे प्रशासनाने विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. हरबर मार्गावरील प्रवाशांनी सकाळी दहा ते दुपारी साडेचारपर्यंत ट्रान्सर्व्हर आणि मुख्यमार्गेकीवरून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक :सांताक्रुज रेल्वे स्थानक ते गोरेगाव रेल्वे स्थानक मेगाब्लॉक असेल. सकाळी दहा वाजेपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक कालावधी आहे. रेल्वे ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळेच शांताक्रुज ते गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान धीम्या रेल्वे मार्गावरील लोकल या जलद रेल्वे मार्गावर वळविण्यात येणार आहे. तसेच जलद मार्गाचे प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे विलेपार्ले आणि राम मंदिरे या उपनगरी रेल्वे स्थानकांवर लोकल थांबणार नाही. परिणामी बोरवली लोकल गोरेगावपर्यंत पुढे वाढवण्यात येईल. इतर लोकल मेगाब्लॉकमुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत.
Mega Block Mumbai News: मुंबईकरांनो आज 'या' तिन्ही रेल्वे मार्गावर आहे मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक - पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक
मुंबईच्या मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे व हार्बर रेल्वे या सर्व तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गावर दुरुस्तीच्या कामामुळे मेगाब्लॉक आहे. त्यामुळे प्रवाशांची आज गैरसोय होणार आहे. प्रवाश्यांनी घरातून बाहेर पडताना लोकल रेल्वे वेळापत्रक पाहून त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
रेल्वे मेगाब्लॉक