मुंबई - कोरोना आटोक्यात आल्यानंतर टप्प्याटप्याने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. (school opens in maharashtra) दहावी-बारावीच्या परीक्षा आणि मूल्यमापन यासंदर्भात आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (education minister varsha gaikwad) यांनी बैठक बोलावली आहे. ऑनलाईन स्वरुपात ही बैठक होणार असून शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, टास्क फोर्स समितीचे सदस्य, पालकवर्ग प्रतिनिधी उपस्थित राहतील.
आज शिक्षण समितीची बैठक -
कोरोनाकाळात मागील शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमात कपात केली होती. यंदा कोरोनाचे संकट आटोक्यात आल्यानंतर शाळा सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही अशाप्रकारे दहावी व बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रक आणि मूल्यमापन आराखडा संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज बैठक बोलावली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा कपात केली जाईल का? अंतिम परीक्षा नेमकी कशी होणार? अशा विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.