मुंबई - उद्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या सिंहासनावर विराजमान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आघाडीची बैठक झाली. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीतून निष्कर्ष मात्र काहीच निघाला नाही. कुणाला कोणते मंत्रीपद मिळेल या प्रश्नावर आघाडीच्या नेत्यांनी गप्प राहणेच पसंद केले.
महाविकास आघाडीची बैठक संपली; मंत्रिमंडळाबाबत मात्र अळीमिळी गुपचिळी - शपथविधी
महाविकास आघाडीची बैठक चार तासानंतर पार पडली. पण या बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही
उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर साहजिकच मंत्रीपदाचे खातेवाटप निश्चित व्हायला हवे होते. तीन पक्ष आघाडीत असल्यामुळे खातेवाटपाची प्रक्रिया किचकट असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रीपदावर एकमत असणारी आघाडी मंत्रीपदाच्या खातेवाटपाबाबत मात्र निर्णय घेऊ शकली नसल्याची माहिती समोर येत आहे.
खातेवाटपाबाबत विचारले असता उद्याच्या दिवस वाट पाहा असे आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. उद्या पुन्हा चर्चा होईल असेही सांगण्यात येत आहे. उद्या सकाळी याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे.