मुंबई:भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाकडून सातत्याने महापुरुषांबाबत होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावरून आणि राज्यातून बाहेर जाणारे उद्योगधंदे तसेच नुकताच उभारलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी 17 डिसेंबरला महामोर्चाचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत या मोर्चाच्या घोषणेबाबत 2 दिवसापूर्वी बैठक पार पडली.
Maha Vikas Aghadi: महामोर्चाच्या तयारीसाठी महाविकास आघाडीची आज बैठक - 17 डिसेंबरला महामोर्चाचा इशारा
Maha Vikas Aghadi: महाराष्ट्राचा अपमान सहन होत नाही त्यांनी येथे एकत्र यावे. महाराष्ट्र द्वेशांना धडा शिकवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सर्वांना केले आहे.

सायंकाळी 4 वाजता बैठक: त्या बैठकीतून 17 डिसेंबरला भायखळा येथील जिजामाता जिजाबाई भोसले उद्यान ते आझाद मैदान आजचा महामोर्चाचा इशारा, राज्य सरकारला देण्यात आला आहे. या बैठकीच्या तयारीसाठी उद्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी सायंकाळी 4 वाजता बैठक पार पडणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
या लोकप्रतिनीधींचा सहभाग: या बैठकीला तीनही पक्षाचे प्रमुख नेते वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान ते आझाद मैदान असा जवळपास साडेपाच किलोमीटरचे अंतर चालत जाणार आहेत. त्या मोर्चात ठाकरे गटाकडून खुद्द उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत हे नेते असणार आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि त्यासोबतच काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण, नाना पटोले, भाई जगताप असे महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. तसेच तिनेही पक्षाचे आमदार खासदार देखील या मोर्चात सामील होणार आहे. त्यामुळे या मोर्चाच्या तयारीबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.