मुंबई :राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अद्याप एकही महाविकास आघाडी मधील नेत्यांची बैठक झालेली नाही. मात्र जवळपास चार महिन्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या बैठक (meeting Mahavikas Aghadi will be held tomorrow) होणार आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा शासकीय निवासस्थान देवगिरी बंगल्यावर (Devagiri Bungalow Mumbai) उद्या मंगळवारी, सायंकाळी ही बैठकपार पडणार आहे. many leaders will be present
अनेक नेत्यांची उपस्थिती :या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत. तर काँग्रेस कडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनिल देसाई, अनिल परब, अरविंद सावंत, सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार होती. मात्र काही कारणास्त ही बैठक रद्द करण्यात आली होती.