मुंबई- महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष बदलण्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगत आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा भार दुसऱ्या नेतृत्वाकडे सोपविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने दिल्लीमध्ये राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी बोलवलेल्या या बैठकीला राज्यातील काँग्रेस मंत्री आणि जेष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा नेमकी कोणाकडे सोपवावी या महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा केली जाणार आहे.
गेली अनेक दिवस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद इतर कोणाकडे तरी सोपवण्यात यावे ही मागणी जोर धरत आहेत. काँग्रेसमधील काही नावे यासाठी विचारात असली तरी राज्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. सध्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. मात्र महसूल मंत्री पद त्यांच्याकडे असल्याने त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाला न्याय देता येत नाही. त्यामुळे त्यांच्या जागी इतर कोणाची निवड करण्यात यावी, ही मागणी काँग्रेस नेत्यांकडून होत आहे.
सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून होणारे प्रदेशाध्यक्ष म्हणून पटोलेंचा उल्लेख-