मुंबई -नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केलेले शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, जैद या आरोपींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तसेच रिया चक्रवर्ती ही देखील एनसीबी कार्यालयात दाखल झाली असून अटक आरोपी आणि रियाची समोरासमोर बसवून चौैकशी केली जात आहे.
शोविक, सॅम्युअल अन् जैदची वैद्यकीय चाचणी पूर्ण, रियासह चौघांनाही समोरासमोर बसवून चौकशी
सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊ आणि आणखी काही जणांची चौकशी केली जात आहे. यामध्ये सीबीआय आणि एनसीबी तपास करत आहे. आज एनसीबीकडून रियाची चौकशी सुरू आहे.
एनसीबीने दोन दिवसांपूर्वी शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा यांच्या घरी छापे टाकले. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. आता त्यांची चौकशी सुरू आहे. आज एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शोविकसह मिरांडा आणि जैद या आरोपींना वैद्यकीय चाचणीसाठी नेले होते. त्यानंतर तासाभरातच एनसीबीच्या कार्यालयात परत आणले. त्यानंतर रिया, शोविक, मिरांडा आणि जैद या चौघांची समोरासमोर बसवून चौकशी केली जात आहे.