महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 10, 2020, 4:03 PM IST

ETV Bharat / state

आयुष डॉक्टरांच्या विरोधात एमबीबीएस डॉक्टर; 'आयुष'ने थोपटले आयएमएविरोधात दंड

11 डिसेंबरला देशभरात व्यापक स्वरुपात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय आयएमएने घेतला आहे. आयएमएच्या या संपाविरोधात राज्यातील आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी डॉक्टरांनी या संपाचा निषेध करत या विरोधात आपले दवाखाने चालू ठेवणार आहेत.

मुंबई
मुंबई

मुंबई- भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने (सीसीआयएम) शल्य व शालाक्यतंत्र विषयाच्या पदव्युत्तर डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेच्या अधिकारासंबंधी स्पष्टता देणारे राजपत्र नुकतेच प्रकाशित केले. या रात्रपत्राला विरोध करण्यासाठी भारतीय वैद्यकीय परिषदे (आयएमए)ने ११ डिसेंबरला देशभरात संप करणार असल्याचे घोषित केले आहे. आयएमएच्या या संपाचा राज्यातील आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी डॉक्टरांनी विरोध करत 11 डिसेंबरला राज्यातील दीड लाख आयुष डॉक्टर वैद्यकीय सेवा सुरू ठेवतील, असे आयुष कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मुंबई
11 डिसेंबरला देशभरात व्यापक स्वरुपात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय आयएमएने घेतला आहे. आयएमएच्या या संपाविरोधात राज्यातील आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी डॉक्टरांनी या संपाचा निषेध करत या विरोधात आपले दवाखाने चालू ठेवणार आहेत. या तिन्ही पॅथीच्या डॉक्टरांनी एकत्र येत राज्यामध्ये आयुष कृती समिती स्थापन केली आहे. आयएमएच्या एकाधिकारशाहीला उत्तर देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. सीसीआयएमने काढलेल्या राजपत्राचे स्वागत ११ तारखेला समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. राज्यातील १,५०,००० पेक्षा अधिक आयुष डॉक्टर्स गुलाबी फीत लावून वैद्यकीय सेवा देणार आहेत. तसेच सरकारला कोठेही डॉक्टरांची कमरता जाणवल्यास तेथेही आयुष डॉक्टर उपलब्ध करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. त्याचप्रमाणे राज्यामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयुष कृती समितीचे सचिव डॉ. आशुतोष गुप्ता यांनी दिली.

आयएमएचा हा निर्णय म्हणजे आपली एकाधिकारशाही अबाधित राखण्यासाठीचा प्रयत्न

सीसीआयएमकडून आयुर्वेद डॉक्टरांना फक्त ५८ शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या शस्त्रक्रिया वगळता आयुर्वेद डॉक्टरांना अन्य कोणत्याही शस्त्रक्रिया करता येणार नाही आहे. विशेष म्हणजे या शस्त्रक्रिया यापूर्वीही आयुर्वेदच्या डॉक्टरांकडून करण्यात येत होत्या. मात्र, त्यासंदर्भात सीसीआयएमकडून आता अधिक स्पष्टता अधोरेखित करण्यात आली आहे. आयएमएचा हा निर्णय म्हणजे आपली एकाधिकारशाही अबाधित राखण्यासाठीचा प्रयत्न आहे. आयुर्वेदाचे शिक्षण घेणार्‍या डॉक्टरांना आयुर्वेद व अ‍ॅलोपॅथी अशा दोन्ही पॅथींचे शिक्षण मिळते. त्यामुळे ते अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांपेक्षा अधिक सक्षम असतात. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिकाधिका आरोग्य सेवा पुरवण्यामध्ये आयुष डॉक्टरांचाच सहभाग असतो. येथे अ‍ॅलोपॅथी डॉक्टर का पुढाकार घेत नाही, असा प्रश्नही गुप्ता यांनी उपस्थित केला.

ABOUT THE AUTHOR

...view details