महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपर्यंत लांबणीवर - uddhav thackrey

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

By

Published : Apr 15, 2021, 1:50 PM IST

मुंबई -महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

या परीक्षा आता येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.

या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आपली उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details