महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Measles Outbreak In Mumbai : मुंबईत गोवरचा उद्रेक; रुग्णसंख्येत १५ पटीने वाढ

मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत (Measles outbreak in Mumbai) आहे. मागील २०२१ वर्षापेक्षा यावर्षी गोवरच्या रुग्णसंख्येत १५ पटीने वाढ (Measles patients 15 times increase) झाली आहे. तर २०२० च्या तुलनेत ६ पटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. (Mumbai measles outbreak update) मुंबईत सध्या गोवरचे १७१ रुग्ण आढळून असून ताप आणि पुरळ आलेले १०७९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. Latest news from Mumbai, Mumbai Update

Measles Outbreak In Mumbai
मुंबईत गोवरचा उद्रेक

By

Published : Nov 15, 2022, 11:06 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत (Measles outbreak in Mumbai) आहे. मागील २०२१ वर्षापेक्षा यावर्षी गोवरच्या रुग्णसंख्येत १५ पटीने वाढ (Measles patients 15 times increase) झाली आहे. तर २०२० च्या तुलनेत ६ पटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. (Mumbai measles outbreak update) मुंबईत सध्या गोवरचे १७१ रुग्ण आढळून असून ताप आणि पुरळ आलेले १०७९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू संशयित मृत्यू असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. Latest news from Mumbai, Mumbai Update

गोवर १५ पटीने वाढला - मुंबईत सप्टेंबर पासून ताप पुरळ आलेले रुग्ण आढळून येत आहेत. यापैकी काही रुग्णांना गोवरचा आजार झाल्याचे समोर आले आहे. मुंबईत २०२० मध्ये ताप आणि पुरळचे २७९ रुग्ण आढळून आले त्यापैकी २५ रुग्णांना गोवर आजार झाला होता. २०२१ मध्ये त्यात वाढ होऊन ताप आणि पुरळचे ४०८ रुग्ण आढळून आले त्यापैकी ९ रुग्णांना गोवर आजार झाला होता. २०२२ यावर्षी आतापर्यंत ताप आणि पुरळचे १०७९ रुग्ण आढळून आले त्यापैकी १४२ रुग्णांना गोवर आजार झाला आहे. २०२० मध्ये २५ रुग्णांच्या तुलनेत यंदा ५ पट तर २०२१ मध्ये आढळून आलेल्या ९ रुग्णांच्या तुलनेत यंदा १५ पटीने वाढ झाली आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण गोवंडी या विभागात आढळून येत आहेत. यापार्श्वभूमीवर येथे लसीकरण मोहीम राबवली जात आहे. गोवंडी एम पूर्व विभागात १३०८ तर मुंबईत ६३७० मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे.


६६ रुग्ण रुग्णालयात, ५ आयसीयूत -जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे १७१ रुग्ण आढळून आले आहेत. तर ताप आणि पुरळ आलेले १०७९ संशयित रुग्ण आहेत. ० ते ८ महिन्याचे १३२, ९ ते ११ महिने १३८, १ ते ४ वर्ष ५६०, ५ ते ९ वर्षे १८७, १० ते १४ वर्षे ५०, १५ आणि त्यावरील १२ असे एकूण १०७९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ० ते ८ महिन्याचे ८, ९ ते ११ महिने ६, १ ते ४ वर्ष ३६, ५ ते ९ वर्षे १५, १५ आणि त्यावरील ३ असे ६६ रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ५ मुले आयसीयुत आहेत.


मुंबईत ७ संशयित मृत्यू -२६ ऑक्टोबर पासून आतापर्यंत मुंबईत ७ मृत्यू झाले आहेत. हे सर्व संशयीत रुग्ण आहेत. त्यामधील कस्तुरबा रुग्णालयात ४, राजावाडी २, आणि १ घरी मृत्यू झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.


२० हजार मुलांच्या लसीकरणावर भर देणार -मुंबईत ० ते २ वयोगटातील पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले आहे. यात २० हजार मुलांचे लसीकरण राहिले आहे. काहींनी एकच डोस घेतला आहे. तर काहींनी लसिकरणच केलेले नाही. त्यामुळे अशा २० हजार मुलांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले जाणार असून या सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.


बेड्सची संख्या वाढवणार -गोवरचे सर्वाधिक रुग्ण गोवंडीत आढळले आहेत. येथील रुग्णांना कस्तुरबा रुग्णालय लांब पडत असल्याने तेथील शताब्दी रुग्णालयात १० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहेत. तसेच या परिसरातील मॅटर्निटी होममध्येही रुग्णांना दाखल केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details