मुंबई- ऐन सकाळी वर्दळीच्या वेळीच लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक कोलमडली आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेची सीएसएमटीकडे जाणारी वाहतूकही उशिराने सुरू आहे. परिणामी लोकलच्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक कोलमडली; प्रवाशांना त्रास - kalyan
ऐन सकाळी वर्दळीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक कोलमडली आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यासोबतच खोळंबलेल्या रेल्वे वाहतुकीचे काम सुरु असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
कॉटन ग्रीन स्टेशन-शिवडी दरम्यान तांत्रिक बिघाड झाला. यामुळे हार्बर रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने तांत्रिक बिघाड दुरुस्त केला असला तरी एकामागोमाग अनेक लोकल खोळंबल्याने मध्य रेल्वेच्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत आहेत. काही वेळ रेल्वेगाड्या वडाळापर्यंत थांबविण्यात आल्या होत्या. मात्र, यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती.
टाटाचा वीजपुरवठा बंद झाल्याने कल्याण-कसारा व कल्याण-कर्जत दिशेकडील मध्य रेल्वेची लोकल वाहतूकही विस्कळीत झाली होती. बिघाड दुरुस्त करण्यात आला असून वाहतूक लवकरच पूर्ववत होईल असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.