माहिती देताना पोलिस अधिकारी मुंबईAction On Drugs: नाशिक पाठोपाठ सोलापूरमधील मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केला आहे. सोलापूरमधील एमआयडीसी परिसरातील चिंचोळी (Solapur Chincholi MIDC) येथे असलेल्या २१०० चौरस फूट एमडी ड्रग्जचा कारखाना उध्वस्त करण्यात दया नायक आणि त्यांच्या पथकाला यश आले आहे. एमडी ड्रग्जच्या मोठ्या धंद्याचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेच्या कक्ष 9 ने सोलापुरात एमडी ड्रग्ज बनवणारा कारखाना उध्वस्त केला असून एमडी बनवण्यासाठी वापरले जाणारे १०० कोटींचे कच्चा माल असलेले रसायन जप्त केले आहे. तसेच खार परिसरातून ५ किलो तर कारखान्यातून ३ किलो एमडी ड्रग्ज (MD Drugs) जप्त आले आहे. या ८ किलो एमडी ड्रग्जची किंमत १६ लाख इतकी आहे. या कारवाईत अतुल किशन गवळी (वय ३२) आणि राहुल किशन गवळी (वय २७) या दोन भावांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कारखान्यावर टाकला छापा : एका गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने अतुल गवळी आणि राहुल गवळी या दोन आरोपींना कार्टर रोड, वांद्रे येथील खार दांडा परिसरातून 1089 ग्राम एमडीसह शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत 10 कोटी 17 लाख 80 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या आरोपींच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी सोलापूर येथील चिंचोली एमआयडीसीमध्ये असलेल्या एका कारखान्यावर छापा टाकला. छाप्यादरम्यान कारखान्यातून सहा कोटी रुपये किंमतीचे तीन किलो एमडी सापडले. याशिवाय कारखान्यात एमडी बनवण्याचे रसायन सापडले आहे, त्याची किंमत 100 कोटी रुपये आहे.
एमडी ड्रग्जची फॅक्टरी सुरू: एमडी ड्रग्ज बनविण्याची फॅक्टरी ७ महिन्यापूर्वी सुरू केलेल्या या दोन्ही भावांचे शिक्षण फक्त १० वी झाले असून, काही दिवसापुर्वी ५ वर्षभर एका केमिकल फॅक्टरीत केलेल्या कामाच्या अनुभवावरून त्यांनी ही एमडी ड्रग्जची फॅक्टरी सुरू केल्याचेही पोलीस उपयुक्त राजतिलक रौशन यांनी सांगितंल आहे. या कारखान्यातून एमडी कोणाला पुरवले जात होते तसेच वर्सोवा येथे हे दोघे भाऊ कोणाला ड्रग्स देण्यासाठी आले होते याचा तपास पोलीस करत आहेत.
४८ गोणी केमिकल्स जप्त : अटक केलेले दोघेही दहावी नापास असून पूर्वी एका केमिकल फॅक्टरी मध्ये काम करत होते आणि तिथेच त्यांनी एमडी कसं तयार करायचं त्याचा प्रशिक्षण घेतलं. त्यानुसार चिंचोली एमआयडीसी येथे 30 हजार रुपये प्रति महिना भाड्याने 21 हजार चौरस फुटी जागा भाड्याने घेऊन तिथे एमडी बनवण्याचा श्री शेंकी नावाचा कारखाना थाटला. गवळी बंधू दोघेही पश्चिम उपनगरात एमडी विकत असल्याचे तपासात समोर आला आहे. कारखान्यात ३ ते चार मोठे निळे ड्रम आणि ४८ गोणी केमिकल्स जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत १०० कोटी आहे. यामध्ये मॅथीनोल, सॉल्वन, ऍसिटोल आणि हायड्रोक्लोराईड नावाचे केमिकल्सचा समावेश आहे. या केमिकल्स दुर्गंध खूप येत असल्याकारणानं केवळ एमआयडीसी जेथे कारखाने असतात त्याच ठिकाणी एमडीचा कारखाना थाटला जातो. जेणेकरून दुर्गंध एमआयडीसी परिसरात हवेत सोडला जाऊ शकतो, असं पोलीस उपयुक्त राजतिलक रौशन यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
हेही वाचा -
- Action on Drugs in Solapur : एमडी ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त; एमडी ड्रग्ज बाजारात पुन्हा आलं सोलापूरचंही नाव
- Nashik MD Drug Case : नाशिक एमडी ड्रग प्रकरणावरुन राजकारण; कनेक्शन थेट अंडरवर्ल्डशी?
- MD Drugs Seized In Amravati : अमरावतीतून 57 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त; ग्रामीण पोलिसांची कारवाई