महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MCA election : एमसीएच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक; 'हे' आहेत निवडणुकीच्या रिंगणात - एमसीएच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक

राज्यभरातील लक्ष लागलेली एमसीएची निवडणूक आज होणार ( MCA election will be held today ) आहे. या निवडणुकीने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले आहे.

MCA election
एमसीएच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक

By

Published : Oct 20, 2022, 10:21 AM IST

मुंबई: राज्यभरातील लक्ष लागलेली एमसीएची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले ( Stirred the politics of Maharashtra ) आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, एकनाथ शिंदे असे राजकारणात एकमेकाचे कट्टर विरोधक असलेले राजकारणी या निवडणुकीच्या माध्यमातून एकाचं मंचावर दिसत आहेत.

पवार-शेलार पॅनेल : या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार यांचे संयुक्त पॅनल ही निवडणूक लढवत आहे. त्यांच्या पॅनलकडून अमोल काळे हे अध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत. तर, दुसरीकडे भारताचे माजी कसोटीपटू संदीप पाटील यांनी अध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आशिष शेलार आणि शरद पवार यांच्या पॅनलकडून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलकडून कार्यकारिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


निवडणूक जिंकण्यासाठी डिनर डिप्लोमाची बैठक : एमसीएच्या निवडणुकीत 380 मतदार मतदान करणार आहेत. ही निवडणूक जिंकावी यासाठी गेल्या दोन दिवसापासून डिनर डिप्लोमाची बैठका सुरू आहेत. 19 ऑक्टोबर च्या सायंकाळी शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांनीही बैठकीचा आयोजन केले होते. यावेळी खेळामध्ये राजकारण आणलं जाणार नाही अशी ग्वाही सर्वच नेत्यांकडून देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी 380 मतदार आहेत. एमसीएची आज सायंकाळी ३ ते ६ वाजे दरम्यान मुंबईच्या एमसीए क्लब येथे मतदान होणार आहे. यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील नामांकित ऑफिसचे क्रिकेट क्लब, मैदान क्लब, माजी कसोटीपटू, आणि शाळा आणि कॉलेज क्लब मतदान करणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details