मुंबई -राज्यभरातील व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमबीए-एमएमएस सीईटी या सामायिक प्रवेशाची परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल आज (शनिवार) सकाळी ११ वाजता सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक ट्वीट करून याबाबतची माहिती दिली.
एमबीए सीईटीचा आज निकाल, सकाळी ११ वाजता संकेतस्थळावर होणार जाहीर
एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल आज (शनिवार) सकाळी ११ वाजता सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. राज्यभरात असलेल्या सुमारे ३६ हजार जागांसाठी ही प्रवेश परीक्षा १४ व १५ मार्च रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यभरातून तब्बल १ लाख १० हजार ६३१ विद्यार्थी बसले होते.
राज्यभरात असलेल्या सुमारे ३६ हजार जागांसाठी ही प्रवेश परीक्षा १४ व १५ मार्च रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यभरातून तब्बल १ लाख १० हजार ६३१ विद्यार्थी बसले होते. गुणवत्तेनुसार ३६ हजार जागांवर प्रवेश होणार आहे.
मागील वर्षी या परीक्षेसाठी राज्यभरातून 1 लाख 11 हजार 846 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 2 हजार 851 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर 20 विद्यार्थ्यांना 200 पैकी 150हून अधिक गुण मिळाले होते. 126 ते 150 पर्यंत गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा 677 इतका होता. 100 पर्यंत गुण मिळवणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने होते. दरम्यान, गेल्यावर्षी याच प्रवेश परीक्षेत बोगस प्रवेश आढळल्याने यंदा ‘एमबीए’, ‘एमएमएस’ प्रवेशासाठी अखिल भारतीय उमेदवारी प्रकारात राज्य सरकारची ‘सीईटी’, ‘सीमॅट’ आणि राष्ट्रीय स्तरावर होणारी ‘कॅट’ परीक्षा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात एमबीए, एमएमएस अभ्यासक्रमासाठी इतर कोणतीही खासगी व्यवस्थापनाची प्रवेशपरीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नसल्याचे सीईटी सेलने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले आहे.