मुंबई :सामायिक प्रवेश परीक्षा2023 व 24 संभाजी परीक्षांचे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने नुकतेच जारी केलेले आहे. त्यानुसार इंजीनियरिंग वैद्यकीय कृषी पदवी या अभ्यासक्रमांसाठी आता सीईटी 9 ते 20 मे 2023 रोजी होणार आहे. तर एमबीए सीईटी (MBA CET Exam) 18 मे आणि 19 मार्चला (MBA CET on 18th and 19th March) होणार, तर एमसीएसीईटी 25 आणि 26 मार्चला (Law CET Exam) होईल.
वेळापत्रक प्रसिद्ध : सीईटीबाबत ह्या वर्षासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश आणि अभ्यास करावा. त्यादृष्टीने राज्य सीईटी सेलकडून वेळापत्रक प्रसिद्ध केले (date of CET Exam) आहे. या शैक्षणिक वर्षात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे सोपे होईल. विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणार आहे. त्यांना पूर्ण तयारी करता येणार आहे. सीईटीद्वारे जारी केलेल्या रूपरेषेनुसार केटरिंग तंत्रज्ञान आणि हॉटेल व्यवस्थापन ह्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश परिक्षा होणार आहे. बीएचएमसीटी सीईटी 20 एप्रिल 2023 रोजी तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची एमएचएमसिटी सीईटी परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी अपेक्षित आहे. यानंतर बी प्लॅनिंग सीईटी ही प्रवेश परीक्षा 23 एप्रिल 2023 रोजी होईल, अशी शक्यता आहे. तसेच वास्तुशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला सीईटी प्रवेश परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी होईल अशी शक्यता (CET Exam 2023) आहे.