महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य सरकारमुळे अनुदानाचा प्रश्न अडकला - महापौर महाडेश्वर - विश्वनाथ महाडेश्वर

खासगी विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे, या मताचे आम्ही आहोत. मात्र, राज्य सरकार याबाबतचा कोणताच निर्णय घेत नाही. तसेच शिक्षणमंत्री बैठकीसाठी वेळ देत नसल्यामुळेच याबाबत कोणताही निर्णय घेता येत नाही, अशी वक्तव्य महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर

By

Published : Mar 9, 2019, 8:37 PM IST

मुंबई - खासगी विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे, या मताचे आम्ही आहोत. मात्र, राज्य सरकार याबाबतचा कोणताच निर्णय घेत नाही. तसेच शिक्षणमंत्री बैठकीसाठी वेळ देत नसल्यामुळेच याबाबत कोणताही निर्णय घेता येत नाही, अशी माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.

महापालिकेने मान्यता दिलेल्या खासगी अनुदानित शाळांना अनुदान मिळावे म्हणून शिक्षकांचे आंदोलन गेले २४ दिवस आझाद मैदानात सुरू आहे. या आंदोलनकर्त्यांनी महाशिवरात्री आणि आज शिवसेना पक्ष प्रमुखांच्या मातोश्री निवास स्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर महापौर बोलत होते.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर

पालिकेतील सर्व पक्षीय गटनेत्यांनी या शाळांना अनुदान द्यावे, असा निर्णय घेतला आहे. अशा शाळांना ५० टक्के अनुदान राज्य सरकार तर ५० टक्के अनुदान पालिकेकडून दिले जाते. या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यायला हवा, असेही ते यावेळी म्हणाले.

शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी मी बोललो आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. मात्र, शिक्षणमंत्री बैठकीसाठी वेळ देत नसल्याने याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही. राज्य शासन आणि आम्ही याबाबत सकारात्मक आहोत, लवकर तोडगा निघेल, अशी आशा महापौरांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details