मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे राज्यातील महापौर आणि उपमहापौरांचा कार्यकाळ तीन महिन्यांनी वाढवून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुंबईच्या महापौरांनाही याचा फायदा होणार असून त्यांना तीन महिन्याचा कालावधी वाढवून मिळाला आहे.
महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना तीन महिन्याची मुदतवाढ; आचारसंहितेमुळे कार्यकाळ वाढणार - उपमहापौर पदाच्या निवडणुका
राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू होत आहे. आचारसंहिता लागू झाल्यावर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका होणार होत्या. मात्र, आचारसंहिता लागू असल्याने या निवडणुका घेण्यास अडचणी आल्या असत्या. यामुळे मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापौर आणि उपमहापौर यांचा कालावधी तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा फायदा मुंबईच्या महापौरांनाही होणार आहे.
राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू होत आहे. आचारसंहिता लागू झाल्यावर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका होणार होत्या. मात्र आचारसंहिता लागू असल्याने या निवडणुका घेण्यास अडचणी आल्या असत्या. यामुळे मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापौर आणि उपमहापौर यांचा कालावधी तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा फायदा मुंबईच्या महापौरांना होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ ला झाली होती. ९ मार्चला २०१७ ला महापौर पदाची निवडणूक झाली. त्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेने महापौरपदावर दावा केला. भाजपाने शिवसेनेला मतदान करून शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांना महापौर बनवले. मुंबईच्या महापौरांचा कालावधी अडीच वर्षांचा असतो. हा कालावधी ८ सप्टेंबरला संपणार आहे. मात्र, त्याच दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे महापौरांना तीन महिन्याचा कालावधी वाढवून मिळाला आहे. त्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे ८ डिसेंबरपर्यंत महापौरपदावर राहणार आहेत.