महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोण कळकळीने अन् कोण कळीने काम करतंय हे सर्वांना माहीत आहे, महापौर पेडणेकर यांची फडणवीसांवर टीका - मुंबई राजकीय बातमी

कोण कळकळीने आणि कोण कळीने काम करत आहे हे महाराष्ट्र पहात आहे, असे म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

महापौर पेडणेकर
महापौर पेडणेकर

By

Published : Apr 18, 2021, 4:52 PM IST

Updated : Apr 18, 2021, 5:33 PM IST

मुंबई -लोकशाही मार्गाने आणि प्रशासनाच्या पद्धतीने राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन यायला पाहिजे. लोकांचा जीव वाचवायचा असेल तर सोबत येऊन काम केले पाहिजे. कोण कळकळीने आणि कोण कळीने काम करत आहे हे महाराष्ट्र पाहात आहे, असे म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

बोलताना किशोरी पेडणेकर

नेमकं प्रकरण काय आहे..?

काल (दि. 17 एप्रिल) रात्री उशिरा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विलेपार्ले पोलीस ठाण्यात पोहोचले. याच पोलीस ठाण्यात दमण येथील ब्रुक फार्मा या कंपनीच्या मालकाला ठेवण्यात आले होते. त्या मालकाला पोलीस ठाण्यात का ठेवले? याचा जाब विचारण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर या ठिकाणी पोहोचले.

महत्वाचे म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे अलीकडेच दमणला या कंपनीमध्ये गेले होते. तेथे त्यांनी रेमडेसीवीरची 50 हजार इंजेक्शने बुक केले आहेत.

हेही वाचा -भाजप महाराष्ट्रासाठी देणार 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन

Last Updated : Apr 18, 2021, 5:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details