महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईकरांना पाणी टंचाईची समस्या जाणवणार नाही - महापौर महाडेश्वर - मुंबई

मुंबईकरांना पाणी टंचाईला समोरे जावे लागू नये, म्हणून महापालिका प्रशासना प्रयत्न करत असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले आहे.

मुंबईकरांना पाणी टंचाईची समस्या जाणवणार नाही - महापौर महाडेश्वर

By

Published : Jun 19, 2019, 5:50 PM IST

मुंबई- शहराला पाणीपुरावठा करणाऱ्या धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईत पाऊस पडला नाही तर पाणी संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे मुंबईकरांना पाणी टंचाईला समोरे जावे लागू नये, म्हणून महापालिका प्रशासना प्रयत्न करत असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले आहे.

मुंबईकरांना पाणी टंचाईची समस्या जाणवणार नाही - महापौर महाडेश्वर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये फक्त 6 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी तानसामध्ये 12 टक्के, मध्य वैतरणामध्ये 13 टक्के, भातसामध्ये 0.90 टक्के, विहारमध्ये 4.89 टक्के, तुलसीमध्ये 24.83 टक्के तर मोडक सागरमध्ये 37.60 टक्के पाणीसाठा आहे. आजच्या दिवशी 2017 मध्ये सातही धरणात 2 लाख 70 हजार 828 दशलक्ष लिटर इतका पाणी साठा होता.

तर 2018 मध्ये 1 लाख 44 हजार 736 दशलक्ष लिटर इतका पाणी साठा होता. यावर्षी मात्र 88 हजार 743 दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना पुढील 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच आहे. त्यामुळे मुंबईत आधीच 10 टक्के पाणी कपात असताना येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही, तर मुंबईकरांना आणखी पाणीकपातीला सामोरे जावे लागू शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details