मुंबई -भंडारा येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई पालिका रुग्णालयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. यानंतर खडबडून जागे झालेल्या मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील खासगी, शासकीय रुग्णालयांच्या फायर ऑडिट करण्यासाठी आदेश दिले आहेत. एका महिन्याच्या आत ही माहिती जमा करावी, असे सांगितले आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी पेडणेकर आल्या होत्या. त्यावेळी त्या माध्यमाशी बोलत होत्या.
हेही वाचा -गेल्या वर्षी कोरोनापेक्षा अधिक मृत्यू रस्ते अपघातांमुळे; वाहतूक उपायुक्तांची माहिती
साध्या पद्धतीने होणार कार्यक्रम
बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण आज त्यांच्या 95 व्या जयंतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अनेक नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर दिसणार आहेत. हा कार्यक्रम हा साध्या पद्धतीने होणार आहे. मुख्यमंत्री अनावरण करणार आहेत, अशी माहिती महापौर यांनी दिली आहे.
कोणी कोणाच्या भेटी घेऊ द्या, काही होत नाही