महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील २७ महापालिकांमध्ये आज ठरणार महापौर, उपमहापौर - latest mumbai news

मुंबईच्या महापौर पदासाठी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर तर उप महापौर पदासाठी सुहास वाडकर यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यांच्या विरोधात कोणत्याही पक्षाने उमेदवार दिला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

आज ठरणार महापौर, उपमहापौर

By

Published : Nov 22, 2019, 9:21 AM IST

मुंबई - महापालिकेच्या महापौराला शहराचा प्रथम नागरिक म्हणून संबोधले जाते. महाराष्ट्रातील महापौर, उपमहापौर पदासाठी आज (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील २७ महापालिकांसाठी ही निडणूक होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधासभेच्या निकालानंतर सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटण्याचे नाव घेत नाही. त्यातच त्या निवडणुकीच्या अगोदर आणि निकालानंतर जी राजकीय उलथापालत मागील काही दिवसात झाली. त्याचा मोठा परिणाम महापौर निवडणुकीच्या निकालावर होणार आहे.

महाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादी-

नाव शहर
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई
पुणे महानगरपालिका पुणे
नागपूर महानगरपालिका नागपूर
ठाणे महानगरपालिका ठाणे
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पिंपरी-चिंचवड
नाशिक महानगरपालिका नाशिक
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कल्याण-डोंबिवली
वसई-विरार महानगरपालिका वसई-विरार पालघर
औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद
नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबई
सोलापूर महानगरपालिका सोलापूर
मीरा-भाईंदर महानगरपालिका मीरा-भाईंदर
भिवंडी-निजामपुर महानगरपालिका भिवंडी-निजामपुर
अमरावती महापालिका नगर निगम अमरावती
नांदेड-वाघाळा महानगरपालिका नांदेड-वाघाळा
कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर
अकोला महानगरपालिका अकोला
पनवेल महापालिका पनवेल रायगड
उल्हास नगर महानगरपालिका उल्हासनगर
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका सांगली-मिरज आणि कुपवाड
मालेगाव महानगरपालिका मालेगाव
जळगाव महानगरपालिका जळगाव
लातूर महानगरपालिका लातूर
धुळे महानगरपालिका धुळे
अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर अहमदनगर
चंद्रपूर महानगरपालिका चंद्रपूर
परभणी महानगरपालिका परभणी

हेही वाचा -प्रशासनाने काश्मीरवरील निर्बंधांबाबत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे - सर्वोच्च न्यायालय

८८ वर्षात पहिल्यांदाच बिनविरोध निवडणूक -

मुंबईच्या महापौर पदासाठी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर तर उप महापौर पदासाठी सुहास वाडकर यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यांच्या विरोधात कोणत्याही पक्षाने उमेदवार दिला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. महापालिकेत महापौर पदाची निवडणूक सुरू झाल्यापासून गेल्या ८८ वर्षात पहिल्यांदाच बिनविरोध निवडणूक होत असल्याचे समजते. मुंबई महापालिकेत गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असल्याने शिवसेनेचाच महापौर निवडून येतो. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४ तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले. जात पडताळणीत अनेक नगरसेवक बाद झाल्याने तसेच मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजप व मित्र पक्षांचे ८३ तर शिवसेनेचे ९४ नगरसेवक आहेत. पालिकेच्या नियमानुसार ज्या उमेदवाराला सर्वात जास्त मते मिळतात तो उमेदवार महापौर म्हणून निवडून येतो. संख्याबळानुसार शिवसेनेचा महापौर होणार हे निश्चित झाले होते. मात्र, भाजपने आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस राष्ट्र्रवादीने उमेदवार दिला नसल्याने ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. यामुळे किशोरी पेडणेकर आणि सुहास वाडकर यांची महापौर आणि उपमहापौर म्हणून निवड होण्याच्या घोषणेची औपचारिकता बाकी राहिली आहे.

महापौर पदाला विशेष महत्व -

१९८५ ते १९९२ पर्यंत शिवसेनेचे सलग महापौर निवडून आले होते. १९९२ मध्ये काँग्रेसचे १९९६ पर्यंत आरपीआय, काँग्रेसचे महापौर निवडून आले. १९९६ - ९७ पासून आतापर्यंत महापालिकेत शिवसेनेचा महापौर निवडून येत आहे. १९९८-९९ ला पालिकेत 'महापौर कौन्सिल' अस्तित्वात आली. एकाच वर्षात 'मेयर इन कौन्सिल' रद्द करण्यात आली. त्यानंतर १९९९ पासून महापौर पदाचा कालावधी अडीच वर्षांचा करण्यात आला. महापौर पदाचा कालावधी अडीच वर्षांचा झाल्याने महापौर पदाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

उद्धव ठाकरे उपस्थित राहणार -

मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक पार पडल्यावर नव निर्वाचित महापौरांचे अभिनंदन करण्यासाठी प्रत्येकवेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच मिलिंद नार्वेकर महापालिकेत येत असतात. यावेळीही निवडणूक प्रक्रिया झाल्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेत नवनिर्वाचित महापौर आणि उप महापौरांना शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत.

पालिकेतील पक्षीय बलाबल -

  • शिवसेना - ९४
  • भाजप - ८३
  • काँग्रेस - २९
  • राष्ट्रवादी - ८
  • समाजवादी - ६
  • एमआयएम - २
  • मनसे - १

ABOUT THE AUTHOR

...view details