महाराष्ट्र

maharashtra

नोकरीच्या नावाखाली लुबाडणाऱ्या टोळीला माटुंगा पोलिसांनी केले जेरबंद

By

Published : Aug 24, 2019, 5:48 PM IST

योगेश राठोड या युवकाने काही महिन्यांपूर्वी quicker.com या वेबसाईटवर नोकरीसाठी स्वतःचा बायोडाटा पोस्ट केला होता. काही दिवसानंतर या पीडित युवकाला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल आले. त्या कॉलच्या माध्यमातून त्याची निवड इंडिगो एअरलाईन्समध्ये टिकीट एक्झिक्युटिव्ह या पदासाठी झाले असल्याचे सांगण्यात आले. युवकाने त्यासाठी १ लाख ३० हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये केले. मात्र परत कॉल न आल्याने युवकाला त्याची फसवणूक झाल्याचे समजले.

नोकरीच्या नावाखाली लुबाडणाऱ्या टोळीला माटुंगा पोलिसांना केले जेरबंद

मुंबई- नामांकित इंडिगो एअरलाईन्स कंपनीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत दीड लाख रुपये उकळणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांच्या माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये तीन पुरुष व एका महिला आरोपीचा समावेश आहे. अंकुर राजेश सिंग (वय २२) अमन कुमार राजेश सिंग (वय २४ ) शेजार मोहम्मद मकबूल (वय २६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यात एका महिलेचा सहभाग आहे.

माहिती देताना पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी

या प्रकरणातील पीडित योगेश राठोड या युवकाने काही महिन्यांपूर्वी quicker.com या वेबसाईटवर नोकरीसाठी स्वतःचा बायोडाटा पोस्ट केला होता. काही दिवसानंतर या पीडित युवकाला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल आले. त्या कॉलच्या माध्यमातून त्याची निवड इंडिगो एअरलाईन्समध्ये टिकीट एक्झिक्युटिव्ह या पदासाठी झाले असल्याचे सांगण्यात आले.

नोकरी हवी असेल तर इंटरव्यू, मेडिकल सर्टिफिकेट व अन्य गोष्टींसाठी १ लाख ३० हजार रुपये टप्प्याटप्प्याने भरावे लागतील असे युवकाला सांगण्यात आले. युवकाने त्याला सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये १ लाख ३० हजार रुपये भरले. मात्र, त्यानंतर त्याला नोकरी विषयी कुठलाही कॉल न आल्यामुळे या संदर्भात त्याने माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती.

पोलिसांनी तपासादरम्यान ज्या बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवण्यात आले होते त्या बँक अकाउंटची माहिती तपासली. त्या आधारे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील रामपूर येथून एका महिलेला अटक केली. महिलेची चौकशी केली असता तिने तिच्या अन्य साथीदारांबद्दल माहिती सांगितली.

सदरची टोळी दिल्ली, नोएडा येथून एका कॉल सेंटरच्या माध्यमातून हे रॅकेट चालवत होते. माटुंगा पोलिसांनी नोएडा सेक्टर ४ मधील कॉल सेंटरवर छापा मारून इतर तीन मुख्य आरोपींना अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून काही सीपीयू, २२ वेगवेगळ्या कंपन्यांचे सिमकार्ड, १९ मोबाईल फोनसह इतर साहित्य जप्त केल आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अंकुर राजेश सिंग (२२) अमन कुमार राजेश सिंग (२४) शेजार मोहम्मद मकबूल (२६) व एक महिला आरोपी अशा ४ आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details