मुंबई : नेरळ-माथेरान टॉय ट्रेन, जी १०० वर्षांहून अधिक जुनी आहे, ही भारतातील मोजक्या पर्वतीय रेल्वेंपैकी एक आहे. टॉय ट्रेनमध्ये एसी सलूनमधून प्रवास करणे हा केवळ एक प्रकारचा अनुभवच नाही तर निसर्ग जवळून पाहण्याची आणि माथेरानच्या नैसर्गिक वातावरणाच्या शांततेत मग्न होण्याची संधी सुद्धा आहे. निसर्ग जवळून पाहण्यासाठी रेल्वेने ए किंवा बी आणि परतीसाठी सी किंवा डी पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. टॉय ट्रेनला जोडलेला एसी सलून कोच आठ आसनी असणार आहे.
ट्रेनच्या वेळा : नेरळ ते माथेरान ट्रिप ए ही नेरळ येथून सकाळी 08.50 वाजाता सुटेल आणि माथेरान येथून सकाळी 11.30 वाजता सुटेल. ट्रिप बीही नेरळ येथून सकाळी 10.25 वाजता सुटेल, माथेरान येथे दुपारी 01.05 सुटेल. माथेरान ते नेरळ ट्रिप सीही माथेरान येथून 02.45 वाजता सुटेल आणि नेरळ येथे दुपारी 04.30 वाजता सुटेल. ट्रिप डीही माथेरान येथून दुपारी 04.00 सुटेल आणि नेरळ येथे संध्याकाळी 06.40 वाजता पोहचेल.
भाडे किती असेल :एकाच दिवशी राऊंड ट्रिपसाठी आठवड्यातील दिवशी ३२,०८८ रुपये, आठवड्याअखेरीस (वीकेंडला) ४४,६०८ रुपये, रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप आठवड्यातील दिवशी रु. ३२,०८८ अधिक १,५०० रुपये प्रति तास., आठवड्याअखेरीस (वीकेंडला) रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप प्रवासासाठी ४४,६०८ रुपये करांसह डिटेंशन शुल्कासह १,८०० रुपये प्रति तास असे भाडे आकारले जाणार आहे. कोणीही ए किंवा बी आणि परतीसाठी सी किंवा डी यापैकी एक पर्याय निवडू शकतो.